spot_img
Thursday, February 22, 2024
spot_img

Latest Posts

ग्रीन टी मुळे शरीरावर होतील दुष्पपरिणाम

ग्रीन टी अशी गोष्ट आहे जी काहींना आवडते तर काहींना नाही.

ग्रीन टी अशी गोष्ट आहे जी काहींना आवडते तर काहींना नाही. बरेच लोक ते आपल्या आरोग्यासाठी चांगले मानून पितात. ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगले आहे. ग्रीनटीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर होतील दुष्पपरिणाम होतात. ग्रीन टी जास्त प्रमाणत प्यायल्याने पोटातील ऍसिडिटीची समस्या वाढू शकते. आणि त्यामुळे जळजळ , गॅस , यासारखे समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन करू नये.

हे ही वाचा :‘मन कस्तुरी रे’ चित्रपटातील फर्स्ट लूक झाला रिलीज

 

ग्रीनटीचे दुष्पपरिणाम –

ग्रीन टी रिकाम्या पोटी पिऊ नये. त्यासोबतच काहीतरी खाण्याचा प्रयन्त करा. दिवसातून ग्रीन टी एकदाच पिणे जर तुम्ही ती जास्त प्रमाणात प्यायलात तर तुमचे आरोग्य बिगडू शकते.

ग्रीन टीमुळे आपल्या किडनीलाही नुकसान होऊ शकते.

ग्रीन टी मध्ये आढळणाऱ्या कॅफ़िनमुळे काहींना चक्कर येते.

ग्रीन टी प्यायल्याने आपली झोप नक्कीच कमी होते. पण जर आपण योग्य प्रमाणात ग्रीन टी प्यायलो तर हा आजार बरा होऊ शकतो. दुपारनंतर ग्रीन टी प्यायल्याने हा दुष्परिणाम होतो. याचे कारण कॅफिन आहे. गरोदर महिलांनी ग्रीन टी पिऊ नये. अन्यथा त्यांच्या बाळालाही झोपेची कमतरता भासू शकते.

 

ग्रीन टीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाब कमी होतो . तुम्हाला देखील हृदयाशी संबंधित समस्या असतील तर डॉकटरांना विचारून ग्रीन टीचे सेवन करणे.

ग्रीन ती दिवसातून २-३ वेळा प्यायल्याने तुम्हाला मायग्रेनची समस्या होऊ शकते.

ग्रीन टी प्यायल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर ऍलर्जी दिसून येते. यापैकी सर्वात सामान्य म्हणजे ओठ, जीभ आणि घशातील समस्या. याशिवाय आपल्या घशात सूज येऊ शकते.

ग्रीन टी प्यायल्यानंतर लगेच काही औषधं घेणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे चेतासंस्थेवर परिणाम करणारी उत्तेजक औषधं ग्रीन टी सोबत पिणे टाळा. त्यातील कॅफिन घटकाचा चेतासंस्थेवर परिणाम झाल्यास रक्तदाब वाढणे, हृद्याचे ठोके वाढणे अशा समस्या वाढू शकतात.

हे ही वाचा :

लालबागच्या राजाच्या दरबारी ‘या’ तारखेला रंगणार सोन्या-चांदीच्या वस्तूंचा लिलाव

 

Latest Posts

Don't Miss