Friday, April 19, 2024

Latest Posts

रोजच्या जेवणात वरण-भात खाणं शरीरासाठी फायदेशीर,जाणून घ्या फायदे

महाराष्ट्रीयन लोकांसाठी वरण भात म्हणजे सुख असतं.प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळी असते.मात्र वरण-भात हे सगळ्यांचाच आहारातील महत्त्वाचा घटक आहे.

महाराष्ट्रीयन लोकांसाठी वरण भात म्हणजे सुख असतं.प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती ही वेगवेगळी असते.मात्र वरण-भात हे सगळ्यांचाच आहारातील महत्त्वाचा घटक आहे.महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण हे रोजच्या आहारात वरण-भात आवर्जुन खात असतात. वरणभात हा पदार्थ पचायला हलका आणि तितकाच पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे. हा हलका आहार घेतल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.वरणाच्या डाळींमध्ये आणि भातामध्ये हेल्दी फॅट्स, अँटिऑक्सिडंट्स, प्रोटिन्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन्स इत्यादी पोषकघटक मुबलक प्रमाणात आढळून येतात.तर वरण-भात खाल्याने शरीराला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊयात

हृदयासाठी फायदेशीर

ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे,त्यांना वरण-भात खाणं हा उत्तम पौष्टिक आहार आहे.कारण तो पचायला हलका आहे.काही आरोग्य तज्ज्ञांच्या मते रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात वरणभाताचे सेवन केल्याने हृदयाशी संबंधित असलेले आजार होण्याची शक्यता कमी होते. यासोबतच हा पचायला हलका आणि पौष्टिक असलेला आहार आपला मूड चांगला ठेवण्यास मदत करते. ज्या लोकांना फिट रहायचे आहे, अशा लोकांनी रात्रीच्या जेवणात वरणभाताचा जरूर समावेश करावा.

हाडांना मिळते मजबूती

हाडं कमकुवत असतील तर आपल्यात कॅल्शिअमची कमी भासते.त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी वरण-भात खाणं उपयोगी ठरु शकतं.तांदूळ आणि डाळींमध्ये प्रथिने आणि कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. या पोषकघटकांमुळे शरीरातील मांसपेशींना आणि हाडांना मजबूती मिळते. वरणभातातील या पोषकघटकांमुळे दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. शक्यतो वरणभात खाताना त्यात डाळींचे प्रमाण अधिक असणे, हे फार महत्वाचे आहे.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

वरण-भात हा वजन कमी करण्यासाठीचं योग्य डायट आहे.वजन कमी करण्यासाठी डाळी आणि कडधान्ये फायदेशीर मानली जातात. कारण, डाळी आणि कडधान्यांमध्ये प्रथिने आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, वरणभात खाल्ल्यानंतर तुम्हाला इतर खाद्यपदार्था खाण्याची क्रेव्हिंग होत नाही. शिवाय, पोट भरलेले राहते त्यामुळे, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.वरणभातामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. त्यामुळे, पोटाच्या समस्या जसे की, गॅसेस, अपचन, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. शिवाय, वरणभातामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे? अशा लोकांनी त्यांच्या आहारात वरणभाताचा जरूर समावेश करावा.त्यामुळे रोजच्या जेवणात आहारामध्ये वरण-भाताचा समावेश करा.

हे ही वाचा:

‘अब की बारी अटलबिहारी’ म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे होता- Raj Thackeray

आमदार आदित्य ठाकरेंची शिंदे फडणवीस सरकारवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss