Saturday, May 18, 2024

Latest Posts

चमकदार आणि डागरहित त्वचा हवी असेल तर आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

बदलत्या जीवशैलीचा परिणाम आपल्या शरीरावर नेमहीच दिसून येतो.

बदलत्या जीवशैलीचा परिणाम आपल्या शरीरावर नेमहीच दिसून येतो. केस गळणे, अकाली वृद्धत्व, पिंपल्स, डार्क सर्कल्स यांसारख्या समस्या जाणवू लागतात. अनेकदा दिवसभर धावपळ करणे, अयोग्य आहार, झोप न लागणे या सगळ्यामुळे कळत नकळत शरीराचे नुकसान होते. यासर्व गोष्टीमुळे त्वचेला हानी पोहचते. काहीवेळेस अयोग्य आहारामुळे त्वचेवर त्याचे परिणाम दिसू लागतात. पण त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फक्त स्किन केअर प्रोडक्ट्स वापरणे गरजेचे नसते तर आहारात हेल्दी पदार्थ खाणे गरजेचे असते. आपण जे पदार्थ खातो त्यातूनसुद्धा आपल्या त्वचेवर सहज दिसून येते. जर तुम्हाला निरोगी सुंदर त्वचा हवी असेल तर तुम्हीच तुमच्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करा.

ओमेगा -3 फॅटी ऍसिड (Omega-3 Fatty Acid)

ओमेगा -3 फॅटी ऍसिड हे शरीरासाठी फायदेशीर असते. ज्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या समस्यांविरूद्ध ओमेगा -३ फॅटी ऍसिड फायदेशीर ठरते. त्वचेला हायड्रेट करण्यासाठी, तेल उत्पादन कमी करण्यासाठी, सूर्याच्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. फिश, बदाम, अक्रोड, फ्लेक्स सीड्स असते.

व्हिटॅमिन सी (Vitamin C)

व्हिटॅमिन सी सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी, आणि डार्क सर्कल्सपासून मुक्त होण्यासाठी, चेहऱ्यावर बारीक सुरकुत्या कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. मोसंबी, लिंबू, बेरी, स्ट्रॉबेरी, भोपळी मिरची इत्यादी लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करणे आहे.

व्हिटॅमिन-ई (Vitamin E)

व्हिटॅमिन-ई मुळे त्वचेतील ओलावा कमी होण्यास मदत होते. बदाम, सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने व्हिटॅमिन-ई शरीराला मिळते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दाहक-विरोधी गुणधर्म असलेले पदार्थ खाणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

नवीन वर्षातली पहिली संकष्टी,चंद्रोदय वेळ, मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या…

कांद्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण, नाशिक बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss