Tuesday, April 23, 2024

Latest Posts

त्वचेची काळजी घेण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अनेकदा कोरडी होते.

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अनेकदा कोरडी होते. या समस्येचा सामना प्रत्येक महिला आणि स्त्रीला सहन करावा लागतो. प्रत्येक स्त्रीला आपली स्किन चांगली हवी असते. स्किन चांगली राहण्यासाठी प्रोडक्ट्समध्ये केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. पण काही काळानंतर चेहरा पुन्हा कोरडा पडू लागतो. चेहऱ्यावर कायम ग्लो टिकून ठेवण्यासाठी त्वचेला आतून पोषण मिळणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता. जे पदार्थ खाल्याने त्वचेवर ग्लो येतो आणि चेहरा निरोगी दिसतो. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेवर जास्त परिणाम होतो. आहारात ‘या’ पदर्थांचे सेवन केल्याने त्वचा हायड्रेट राहते, चेहऱ्यावरील सूज आणि एॅलर्जीपासून संरक्षण होते. जाणून घेऊया कोणते आहेत ते पदार्थ.

रताळे

रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असते. ते शरीरासाठी पोषणाचे पॉवर हाऊस मानले जाते. रताळ्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरात गेल्यानंतर व्हिटॅमिन ए मध्ये त्याचे रूपांतर होते. ज्यामुळे शरीराच्या पेशी दुरुस्त होतात. हिवाळ्याच्या दिवसांत रताळे खाल्ल्याने त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी राहते.

पालक

पालक ही एक पालेभाजी आहे. पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. पालकांमध्ये व्हिटॅमिन ए, सी तसेच लोह मुबलक प्रमाणात आढळून येते. पालक खाल्ल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. हिवाळ्यात, सॅलाडपासून भाज्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीत पालकाचा वापर केल्याने त्वचा चमकदार दिसू लागते.

एवोकॅडो

हिवाळ्यामध्ये एवोकॅडो खाल्ले जाते. एवोकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळून येतात. ज्यामुळे तुमची त्वचा ग्लोइंग आणि तुमचे आरोग्यही चांगले राहते. एवोकॅडो हे एक प्रकारचे क्रीमयुक्त फळ आहे. कोरड्या त्वचेचे समस्या असलेल्या व्यक्तीने एवोकॅडो खाल्ले पाहिजे.

मासे

मासे खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड आढळून येते. चेच्या दुरुस्तीसाठी हे पदार्थ खाणे महत्वाचे मानले जाते. मासे खाल्ल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर कमी होतो.

हे ही वाचा:

आमदार अनिल बाबर यांचा ‘सरपंच ते आमदार’ की मिळवण्यापर्यंतचा प्रवास

भूमी पेडणेकरचा आगामी ‘भक्षक’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss