Saturday, March 2, 2024

Latest Posts

LIFESTYLE: HAIR DRYER वापरताना ‘ही’ काळजी घ्या

हिवाळ्यात तुम्ही हेयर ड्रायर (HAIR DRYER) चा वापर करत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. हिवाळ्यात हेअर ड्रायरचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. यामुळे केस त्वरित कोरडे करून तुम्हाला थंडीपासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. तसेच, स्टाईलिश दिसण्यासाठी देखील हेयर ड्रायर खूप सोयीस्कर उपाय आहे.

जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं असेल तेव्हा तुम्ही अनेकदा तुमचे केस धुण्याची, ताबडतोब कोरडे करण्याची आणि स्टाईल करण्याची घाई करत असतात. पण, या घाईत तुमच्याकडून हेअर ड्रायरचा गैरवापर होऊ शकतो. ज्यामुळे आपल्या केसांना हानी पोहोचू शकते. जेव्हा तुम्ही घाईघाईने केस वाळवतात तेव्हा हेअर ड्रायरमधून बाहेर पडणारी गरम हवा तुमच्या केसांचा नैसर्गिक ओलावा नष्ट करते. त्यामुळे टाळू खराब होऊ लागते आणि केस कोरडे होऊन खराब होतात.

काय आहेत तोटे ?

जर तुम्ही हेअर ड्रायर (HAIR DRYER) चा नीट वापर केला नाही, तर हेअर ड्रायरमुळे तुमच्या केसांना खूप नुकसान होऊ शकते. जेव्हा तुम्ही हेअर ड्रायर वापरता तेव्हा गरम हवा केसांच्या पृष्ठभागावरील सर्व नैसर्गिक ओलावा शोषून घेते. त्यामुळे केस खूप कोरडे आणि कमकुवत होतात. तसेच यामुळे केसांची प्रथिने नष्ट व्हायला सुरुवात होते. यामुळे केस सहजपणे तुटू लागतात. हिवाळ्यात थंडीचा परिणाम त्वचेवर लवकर होतो. त्यामुळे तुम्ही जर हेअर ड्रायरने केस जास्त गरम केले तर त्याचा स्कॅल्पवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे हिवाळ्यात हेअर ड्रायर नेहमी कमी हिट किंवा मध्यम हिटवर वापरावे.

हेअर ड्रायर (HAIR DRYER) मधून गरम हवा बाहेर पडते ज्यामुळे तुमचा टाळू आणि केस जास्त प्रमाणात कोरडे होऊ शकता. जेव्हा ही गरम हवा तुमच्या डोक्यात आणि मेंदूपर्यंत पोहोचते तेव्हा शरीरातील तापमान वाढायला सुरुवात होते. त्यामुळे मेंदूच्या पेशी आणि ऊतींचे नुकसान होऊ शकते. याशिवाय डिहायड्रेशन म्हणजेच शरीरातून पाण्याची कमतरता देखील सुरू होते जी मेंदूसाठी हानिकारक ठरू शकते. यासोबतच, हेअर स्प्रे (HAIR SPRAY) किंवा सीरम (SERUM) चाही वापर करणे उपयुक्त ठरू शकेल. जेणेकरून केसांचा नैसर्गिक ओलावा कायम राहील. असे केल्यास तुम्हाला कोणत्याही हानी शिवाय हेअर ड्रायर (HAIR DRYER) चा फायदा होऊ शकतो. हेअर ड्रायरचा जास्त वापर मेंदूसाठी धोकादायक ठरू शकतो.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss