Saturday, May 18, 2024

Latest Posts

 नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करा घरच्या घरी,अशा पद्धतीत करा नवीन वर्षाचं स्वागत

 नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करा घरच्या घरी,अशा पद्धतीत करा नवीन वर्षाचं स्वागत

२०२३ या सरत्या वर्षाला निरोप द्यायला आता काहीच दिवस उरले आहेत.या वर्षात आपण काय केलं,काय मिळवलं या गोष्टी तर आहेतचं मात्र आता नवीन वर्षाचं स्वागत कसं करायचं याचा विचार आता सगळ्यांना पडला असणार नक्की.दरम्यान आता नवीन वर्ष 2024 सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासठी सारेच सज्ज झाले आहेत. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी बहुतेक लोक बाहेर जातात आणि कुटुंब आणि मित्रांबरोबर पार्टी करतात. पण काही लोकाना कामामुळे किंवा इतर कारणांनमुळे बाहेर जाणं शक्य होत नाही,बाहेर जाता आलं नाही म्हणुन सेलिब्रेशन करायचं नाही असं तर होत नाहीना,मग काळजी करु नका घरच्या घरी आता तुम्हाला कसं सेलिब्रेशन करता येईल याचे टीप्स मी तुम्हाला आता देणार आहे.

मित्रांबरोबर घरी मूवी पार्टी करा 

जर काही कारणास्तव तुम्ही मित्रांबरोबर नवीन वर्ष साजरे करण्यासाठी बाहेर जाऊ शकला नाहीत, तर तुम्ही काही खास मित्रांना तुमच्या घरी बोलावू शकता. तुम्ही घरी बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येईल.

छान जेवण बनवा

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही घरी विविध प्रकारचे अन्न तयार करू शकता. यामध्ये तुम्ही काही खास केक आणि अनेक स्नॅक्स घरीही बनवू शकता. जर तुम्हाला हे पदार्थ कसे बनवायचे हे माहित नसेल तर तुम्ही यूट्यूबची मदत घेऊ शकता. याबरोबरच दिवसाची रंगत आणखी वाढविण्यसाठी तुम्ही कॅंडल लाईट डिनर तुम्ही या दिवशी करू शकता.

खेळ खेळा

तुम्ही घरी पाहुण्यांबरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळू शकता. मित्र आणि कुटुंबासह मजा करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही अंताक्षरी आणि पत्ते असे अनेक खेळ खेळू शकता.

नवीन वर्षाचा संकल्प करा 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे विचार, यश आणि गेल्या वर्षभरातील ज्या गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात ते लिहिण्यासाठी थोडा वेळ काढता. तसेच, येत्या वर्षात आपले ध्येय निश्चित करण्यासाठी नवीन वर्षाचे संकल्प करा आणि काही सवयी बदला.

घरबसल्या कार्यक्रम पाहा 

घरात बसून लाईव्ह इव्हेंट्सचा आनंद घ्यायचा असेल, तर नवीन वर्षाच्या निमित्ताने आजकाल टीव्ही आणि यूट्यूबसह अनेक वेबसाईटवर लाईव्ह इव्हेंट्स सुरू आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही घरी बसून नवीन वर्षाचे कर्यक्रम पाहू शकता.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss