Friday, April 19, 2024

Latest Posts

वजन कमी करायचं आहे,तर हे फळ खा,शरीरासाठी फायदेशीर

सध्याची आपली जीवनशैली ही बदलत जात आहे.रोजचं आपलं धकाधकीचे जीवन आणि त्यामुळे खालेले बाहेरचे पदार्थ याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

सध्याची आपली जीवनशैली ही बदलत जात आहे.रोजचं आपलं धकाधकीचे जीवन आणि त्यामुळे खालेले बाहेरचे पदार्थ याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.अपुरा व्यायाम इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या सगळ्यात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मग, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करत असतो.वाढलेले वजन कमी करण्यासाठी फळे अतिशय फायदेशीर आहेत. फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, फायबर्स आणि मिनरल्सचा समावेश आढळून येतो. त्यामुळे, फळांचा आहारात समावेश करणे हे फायद्याचे ठरते.जाणुन घेऊयात वजन कमी करण्यासाठी संत्र हे फळ कसे आणि किती फायदेशीर आहे..

व्हिटॅमिन सी

संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येते. हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. हे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पेशींचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करते. विविध संसर्गजन्य आजारांपासून आपल्याला दूर ठेवते. या व्यतिरिक्त शरीरातील पचनक्षमता सुरळीत ठेवण्याचे काम संत्रा करते आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते.

कॅलरीजचे प्रमाण कमी

संत्र्यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी हे फळ अतिशय लाभदायी आहे. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश असतो. हे पोषकघटक आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

मध्यम आकाराचे फळ असलेल्या या संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशिअम, कॅल्शिअम आणि फायबर्सचा समावेश असतो. त्यामुळे, हे फळ आपल्या दररोजच्या सेवनाच्या १००%  गरजा पूर्ण करू शकते. या फळाचे सेवन केल्याने आपले पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

उच्च फायबरयुक्त फळ

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्सचा समावेश असतो. या लिंबूवर्गीय फळातील फायबर्समुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि पोट भरलेले राहते. फार भूक लागत नाही. उत्तम आरोग्यासाठी फायबर्सचे जास्त सेवन करणे फायद्याचे ठरते. त्यामुळे, शरीराला ताकद मिळते. या उच्च फायबरयुक्त संत्र्यामुळे वजन कमी करण्यास, शरीरातील चरबी घटवण्यासाठी आणि बॉडी मास इंडेक्स सुधारण्यास देखील मदत होते.

हे ही वाचा:

आरक्षण कधी मिळणार हे एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंची सरकारवर टीका

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात रजित कपूर साकारणार औरंगजेबची भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss