Friday, July 26, 2024

Latest Posts

थंडीत चेहऱ्यावर काळवटलेला दिसून येतोय, तर घरच्या घरी  करा ‘हे’ उपाय

हिवाळा सुरु झाला की,शरीरातील अनेक ब्याधी डोक वर काढायला सुरुवात करतात.त्याचप्रमाणे आपण थंडीत चेहऱ्याची विशेष काळजी घेत असतो.

हिवाळा सुरु झाला की,शरीरातील अनेक ब्याधी डोक वर काढायला सुरुवात करतात.त्याचप्रमाणे आपण थंडीत चेहऱ्याची विशेष काळजी घेत असतो.हिवाळा  सुरू होताच आपली त्वचा कोरडी होत,चेहऱ्यावर सुरकुत्या देखील येतात.तसचं चेहऱ्यावर कोरडेपणामुळे  काही लोकांची त्वचाही काळी पडते. या समस्येचा सामना करण्यासाठी आपण अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. पण, तरीही त्याचा कोणताही परिणाम दिसत नाही. काही काळानंतर, त्वचा कोरडी होताच, ती पुन्हा काळी दिसू लागते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या प्रोडक्टसचा वापर करण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय देखील करु शकता,चला तर मग जाणुन घेऊयात घरच्या घरी कशी त्वचा ग्लो करता येईल.

गुलाब पाणी वापरा

चेहऱ्यावर नैसर्गिक टोन दिसावा म्हणून तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता. तुम्ही त्यात ग्लिसरीनचे काही थेंब टाकू शकता. रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करायला विसरू नका. यानंतर हे टोनर चेहऱ्यावर स्प्रे करा. तुम्ही हात आणि पायांवरही लावू शकता. त्वचा मऊ करण्याबरोबरच मृत पेशी काढून टाकून ती चमकदार बनवण्यातही मदत होईल.

गरम पाण्याचा वापर कमी करा

थंडीच्या दिवसांत वातावरणात थंड असल्यामुळे आपण जास्त गरम पाण्याचा वापर करत असतो.दरम्यान अनेकजण गरम पाण्याने अंघोळ करतात. तसेच, चेहराही गरम पाण्याने धुतात. पण, यामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करा पण गरम पाण्याने चेहरा धुवू नका. दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमचा चेहरा काळवंडू शकतो आणि कोरडेपणामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते.

चेहऱ्यावर साबण लावू नका

चुकूनही चेहऱ्यावर साबण लावू नये. साबणातील रसायने त्वचेला वाईटरित्या नुकसान करू शकतात. चेहऱ्यावर साबण लावल्याने त्वचा लवकर कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. यामुळे तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक निघून जाते.

डेड स्किन काढून टाकण्यास विसरू नका

डेड स्किन काढून टाकल्याने त्वचा ताजेतवाने वाटते. त्यामुळे दररोज आंघोळीपूर्वी मृत त्वचा काढून टाका. यासाठी तुम्ही घरच्या घरी स्क्रब तयार करू शकता. दह्यामध्ये पीठ मिसळून तुम्ही स्क्रब तयार करू शकता. हा स्क्रब लावा आणि चेहरा, मान आणि पाय हलक्या हाताने मसाज करा हे तुमच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास आणि ती चमकण्यास मदत करतील.दरम्यान हे घरगुती उपाय करुन पाहा चेहऱ्यावर नक्कीच फरक दिसून येईल.

हे ही वाचा:

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र आणि राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रोश मोर्चा

कोरोना घालतोय धुमाकूळ!, २४ तासात ५२९ नव्या रुग्णांची नोंद, तर ३ मृत्यू…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss