वाचून चकित व्हाल, ‘इतके’ आहेत शेंगदाण्याचे फायदे

वाचून चकित व्हाल, ‘इतके’ आहेत शेंगदाण्याचे फायदे

शेंगदाण्यांमध्ये विविध प्रकारचे गुण आढळतात. यामुळे शरीराला फायदे होतात. शेंगदाण्यांचा उपयोग वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यास होतो. यामुळे पदार्थाची चव वाढते. भरपूरजण रोजच्या जेवणात शेंगदाण्यांचा तेलाचा वापर करतात. शेंगदाण्यामध्ये कैल्शियम, विटामिन A आणि प्रोटीन असते यामुळे मसल्स घट्ट करतात. शेंगदाणे जर पाण्यात भिजवून खाल्ले तर पचन क्रिया चांगली राहते. थंडीमध्ये गूळ आणि शेंगदाणे खाल्याने सांधेदुखी, कंबरदुखीपासून सुटका होण्यास मदत होते. शेंगदाणे खाल्ल्यावर रक्ताची कमी भरून निघते आणि शरीराला ऊर्जा मिळते. शेंगदाण्यात तेल असल्यामुळे ओला खोकला आणि भूक न लागणे या सारख्या समस्या दूर होतात.

दररोज शेंगदाणे खाल्यास महिला आणि पुरुषांमधले हार्मोन्सचे संतुलन राहते. आठवड्यातून पाच दिवस जर शेंगदाण्याचं नियमित सेवन केल्यास हृदयापासून होणारे आजार होत नाहीत. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. गर्भवती महिलांनी शेंगदाणे खाल्यास गर्भ आणि बाळाचा विकास होण्यासाठी मदत होते. शेंगदाण्यांमध्ये अँटी-ऑक्सिडेंटचे घटक आहेत. यामुळे तर शेंगदाणे रोज खाल्यास त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. मुलांच्या आहारात शेंगदाण्यांचा समावेश केल्यास मेंदूची वाढ, स्मरणशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. ज्यांना उष्णतेचा आणि पित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी शेंगदाणे खाणे टाळले पाहिजे.

हे ही वाचा:

‘अलबत्या गलबत्या’ आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर

‘काकडीचा झुणका’ कधी केलाय का?, या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version