Tuesday, May 21, 2024

Latest Posts

आधी मातेचं रक्षण नंतर गोमातेचे, Uddhav Thacakeray यांचा BJP ला टोला

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यांची कल्याण येथे सभा पार पडली. महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढणाऱ्या शिवसेना उबाठाच्या उमेदवार वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांच्या प्रचारार्थ हि सभा पार पडली.

यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह महायुतीवर (Mahayuti) जोरदार टीका केली. “कल्याण लोकसभा मतदारसंघात एक महिला न डगमगता हुकूमशाहीविरोधात उभी ठाकली आहे. वैशालीताईने हे धाडस तुमच्यासाठी केलं आहे’, असा विश्वास उद्धव ठाकरे ह्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना व्यक्त केला.आता पुन्हा गद्दारीची पाळंमुळं आम्ही इथे रुजू देणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी ह्या सभेतू विरोधकांना दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात आणि देशात इंडिया आघाडीचं सरकार येणारच. इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर आम्ही महाराष्ट्राची लूट थांबवू. गुजरातला पळवलेलं महाराष्ट्राचं वैभव आम्ही पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही. मोदीजी तुम्ही १० वर्ष सरकारमध्ये होतात आणि आज तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल कळवळा आलं आहे.”

“अनेकदा आम्ही सांगितलं, मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या. अजून का दिला नाही? आज अमित शहा कुठेतरी बोलले, मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा. जो गोहत्या करेल त्याला उलटे टांगू. मग गेली १० वर्षे तिरकं टांगला होत का? गोहत्या केल्यावर उलटे रंगणार पण मणिपूरमध्ये महिलांचे जे धिंडवडे काढले त्यांच्यासोबत अमित शहा तुम्ही का उलटे झालात? तुमचं डोकं खाली आणि पाय वर का झाले? आम्हाला पहिले मातेचं रक्षण करायचंय, गोमातेचे आम्ही नंतर करणार,” असे ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा:

अजित पवारांच्या अनुपस्थितीवर शरद पवारांचा खुलासा

राहुल गांधी, खरगेंनतर CM Eknath Shinde यांच्याही बॅगांची तपासणी, शिवसेनेत नाराजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss