Saturday, July 27, 2024

Latest Posts

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचा SIT द्वारे तपास व्हावा: Kirit Somaiya

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर (Ghatkopar Hoarding Incident) एस आय टी द्वारे तपास करण्याची मागणी केली आहे तसेच, शिवसेना उबाठा पक्षावर (Shivsena UBT) आणि शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर आरोप केले आहेत. ‘जेथे होर्डिंग्जची दुर्घटना घडली तेथील पेट्रोल पंप उद्धव ठाकरे यांचे मित्र लॅार्ड यांना हे चालवण्यासाठी द्या असे ठाकरेंच्या कार्यकाळात सांगितले होते,’ असा आरोप त्यांनी यावेळी केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी काल रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा मागितला. आदित्य ठाकरेंना सांगायचे आहे ही जागा तिथे लागलेले १६ होर्डिंग हे तुमचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लागले आहे. जेथे होर्डिंग्जची दुर्घटना घडली तेथील पेट्रोल पंप उद्धव ठाकरे यांचे मित्र लॅार्ड यांना हे चालवण्यासाठी द्या असे ठाकरेंच्या कार्यकाळात सांगितले होते. आदित्य ठाकरे तुम्ही काय मागणी करणार, नकली सेनेचे पक्षप्रमुख पद सोडा अशी मागणी करणार का?”

पुढे ते म्हणाले, “दुर्घटनाग्रस्त होर्डिंग्जच्या बाजूच्या तीन साईटवर १२ होर्डींग्ज आहेत. लोहमार्ग पोलिस आयुक्त कैसर खलिद यांच्या हे पत्रात इगो मिडीयाला १० वर्षासाठी हे दिले आहे असे स्पष्ट नमुद केले होते. यातच इगो मिडीया म्हणजेच भावेश भिंडेने सांगितले की आम्हाला फाउंडेशनसाठी खूप खर्च आहे. तेव्हा उद्धव ठाकरेंच्या परवानगीने १० ऐवजी ३० वर्षासाठी हे टेंडर ताबडतोब वाढवून देण्यात आले. ही जागा गृहविभाग राज्य शासनाच्या अंतर्गत आहे. त्यामुळे यावर मुंबई महानगरपालिकेचे नियम लागू होतात. त्यामुळे महानगरपालिकेने नोटीस बजावली. तेव्हा कैसर खलिद यांनी खोटी माहिती दिली. ही जागा केंद्र सरकार रेल्वे शासन अंतर्गत आहे. तेव्हा महानगरपालिकेने त्यांना पुन्हा पत्र पाठवले; ही जागा राज्य शासनाची आहे असे त्यात लिहिले होते.”

“स्ट्रक्चर सर्टिफिकेट देणाऱ्या मनोज रामक्रिष्णा यांच्यावर खोटे सर्टीफीकेट देण्यासाठी एफआयआर करावा. कैसर खलिद यांना तपास पुर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवावे. भावेश भिंडेला महिन्याला शंभर करोड  मिळत होते आणि पेट्रोल पंपला २५ करोड मिळत होते. हा शंभर करोड रूपयांचा घोटाळा आहे , याची लवकरात लवकरात ईडी ने व आयकर विभागाने तपासणी करावी, ” अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.

हे ही वाचा:

अजित पवारांच्या अनुपस्थितीवर शरद पवारांचा खुलासा

राहुल गांधी, खरगेंनतर CM Eknath Shinde यांच्याही बॅगांची तपासणी, शिवसेनेत नाराजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss