Wednesday, May 1, 2024

Latest Posts

‘काकडीचा झुणका’ कधी केलाय का?, या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पदार्थ खात असतो. या दिवसात शरीर ताजे ठेवणे गरजेचे असते. उन्हाळ्यात काकडीचे सेवन जास्त केले जाते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. काकडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. काकडीचा उपयोग विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. काकडीपासून कोशिंबीर, थालीपीठ इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण कधी काकडीचा झुणका बनवला आहे का? हा पदार्थ चवीला खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो. चला तर जाणून घेऊयात काकडीच्या झुणक्याची रेसिपी.

साहित्य

  • काकडी
  • तेल
  • बेसन
  • मोहरी
  • हिंग
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • लाल तिखट
  • हळद
  • कोथिंबीर
  • कढीपत्ता

कृती

सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुऊन घ्यावी. त्यानंतर काकडीचे साले काढून घ्यावी. किसणीच्या साहाय्याने काकडीला किसून घ्या. काकडीचा किस तयार करून त्यातला पूर्णपणे पाणी काढून घ्या. गॅसवर कढई गरम करत ठेवा. त्या कढईमध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, टाकून फोडणी द्या. लाल तिखट, हळद आवडीप्रमाणे मसाले टाकून सर्व एकत्र करून घ्या. त्यामध्ये आता किसलेली काकडी आणि मीठ टाकून परतून घ्या. एका बाउलमध्ये बेसन आणि पाणी टाकून बॅटर तयार करा. बॅटर जास्त घट्ट आणि पातळ पण नको. तयार केलेले बेसनाचे बॅटर कढईमध्ये टाका. बेसनाचे बॅटर चांगले एकत्र करून घ्या. मंद आचेवर झाकण ठेवून चांगले शिजवून घ्या. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. तयार आहे काकडीचा झुणका. हे तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये चपाती किंवा भाकरीसोबत देऊ शकता.

हे ही वाचा:

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss