spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

हिवाळ्यामध्ये फेसवॉश ऐवजी ‘या’ गोष्टींनी चेहरा धुवा, चेहरा अजून ग्लो करेल

हिवाळा ऋतूला सुरुवात झाली आहे.

हिवाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. या ऋतूमध्ये त्वचेसंबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. प्रत्येक मुलीला आपली त्वचा पिंपल्सरहित आणि तजेलदार असावी असे सगळ्यांचं वाटते. यासाठी महिला अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने (Beauty Products) वापरतात. सर्वात आधी, चेहऱ्यावर फेस वॉश (Face Wash) लावतात. ज्यामुळे चेहरा स्वच्छ होईल. पण, प्रत्येक वेळी रसायनयुक्त फेस वॉश वापरणे गरजेचे नाही. त्यामुळे अनेक वेळा त्वचेच्या समस्या आणखीन वाढू शकतात. त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी काही घरगुती गोष्टींचा वापर करणे गरजेचे आहे. या नैसर्गिक गोष्टींनी तुम्ही तुमचा चेहरा धुवू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा अधिक ग्लो करेल. या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

बेसनाचे पीठ

चणा डाळीपासून बनवलेले बेसन चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे. पूर्वी लोक चेहरा तजेलदार करण्यासाठी चेहऱ्यावर बेसनाचे पीठ लावायचे. हा बेसनाचा फेस पॅक तयार करण्यासाठी बेसनामध्ये गुलाब पाणी आणि दही मिसळून त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि साधारण४-५ मिनिटांनी चेहरा हलक्या हाताने धुवून घ्या. तुमच्या चेहऱ्यावर काही दिवसांतच नैसर्गिक ग्लो येईल.

मध
मधाच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट होते आणि चेहऱ्यावरची चमक कायम राहते. याशिवाय त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आढळतात, जे त्वचेला आरामदायी प्रभाव देतात. यासाठी सर्वात आधी चेहरा हलका ओला करा. यात थोडे मध घेऊन चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने चोळा आणि थोड्या वेळाने चेहरा धुवा.

टोमॅटोचा रस

टोमॅटोमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. टोमॅटोच्या रसाने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि चेहऱ्यावरचे डागही दूर होतात. टोमॅटोचा रस लावण्यासाठी त्याचा रस काढा आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. यानंतर, ५-७ मिनिटे चेहरा तसाच ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे चेहरा तजेलदार दिसेल.

हे ही वाचा:

CHRISTMAS 2023 : घरच्या घरी ‘असा’ बनवा EGGLESS DRYFRUIT CAKE

मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरेला जामीन मंजूर, जालना, बीडमध्ये तीन महिने येण्यास बंदी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss