Wednesday, February 28, 2024

Latest Posts

ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी ‘बॉक्सिंग डे’ का साजरा केला जातो, जाणून घ्या सविस्तर माहिती

जगभरात २५ डिसेंबरला नाताळ हा सण साजरा केल्यानांतर दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे साजरा केला जातो.

जगभरात २५ डिसेंबरला नाताळ हा सण साजरा केल्यानांतर दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे साजरा केला जातो. विशेषता हा दिवस पाश्चिमात्य देशात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. युकेमध्ये हा दिवस साजरा केला जातो. बॉक्सिंग डेच्या दिवशी पाश्चिमात्य देशात एक दिवसाची सुट्टी जाहीर केली जाते. हा डे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्कॉटलंड, आयर्लंड, कॅनडा इत्यादी ब्रिटिश कॉमनवेल्थ देशात साजरा केला जातो. ही एक ब्रिटिश प्रथा आहे. जी अनेक देशांमध्ये लागू करण्यात आली आहे.

बॉक्सिंग डेचा कोणत्याही खेळाशी काहीही संबंध नाही. या दिवसाची सुरुवात पाश्चिमात्य देशांमध्ये गरजूंना दान देण्याचे प्रथेने साजरा केली जाते. जुन्या काळात अनेक लोक या दिवशी बॉक्स भरून गरिबांना भेटवस्तू देत असतात. बदलत्या काळानुसार या दिवसाची उद्देशही खूप बदलला आहे. दरवर्षी ख्रिसमसनंतर दुसऱ्या दिवशी कुटुंबासोबत खास वेळ साजरा केला जातो. तसेच या दिवशी सुट्टी असल्यामुळे अनेक लोक कुटुंबासह खरेदीसाठी बाहेर जातात. गेल्या अनेक वर्षपासून हा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवणे. या दिवशी युके आणि आयर्लंडमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. पूर्वीच्या काळी अनेक लोक आपल्या घरातील कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देत आणि आदल्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी देत जेणेकरून ते सर्व आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकतील. सध्या जर्मनी, हंगेरी, नेदरलँड आणि पोलंड या युरोपियन देशात बॉक्सिंग डे साजरा केला जातो. या दिवशी अनेक लोक फुटबॉलचे सामने बघतात. युकेमध्ये ही खूप जुनी परंपरा आहे. तसेच अनेक लोक मोठ्या प्रमाणावर शॉपिंग करतात. या दिवशी अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या लोकांना ऑफर्स देतात.

हे ही वाचा:

नागपूरच्या बालसुधार गृहातून सहा विधिसंघर्षग्रस्त पळाले

सप्तपदी घेत गौतमी-स्वानंदचा पार पडला विवाहसोहळा,फोटो आले समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss