Monday, May 20, 2024

Latest Posts

Eknath Shinde आणि Ajit Pawar यांना BJP कवडीची किंमत देत नाही – Bhaskar Jadhav

शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी काल (बुधवार, ८ मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.

शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी काल (बुधवार, ८ मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सडकून टीका केली. नवी मुंबई येथील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी,’एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना भाजप कवडीची किंमत देत नाही’ असे वक्तव्य केले.

काल नवी मुंबई मध्ये राजन विचारे यांची प्रचारसभा पार पडली या प्रचारसभेदरम्यान महाविकास आघाडीचे आमदार भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काल झालेल्या या सभेमध्ये शिवसेनेचे नेते भास्कर जाधव देखील उपस्थित होते. त्यांनी बोलताना ठाण्याच्या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजप कवडीची किंमत देत नसल्याची टीका केली. पुढे ‘दहा वर्षात जनेतेची झालेली फसवणूक यामुळे आम्ही नाममात्र उमेदवार असून ही निवडणूक जनतेनेच हातात घेतली असून, जनताच सरकार उलथवून टाकेल’ म्हणत त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली.

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला असून येत्या १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडेल. यावर्षीची निवडणूक ठाण्यातून नरेश म्हस्के (Naresh Mhaske)आणि राजन विचारे लढवणार असून नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून तर राजन विचारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून हि निवडणूक लढवणार आहेत. काल पार पडलेल्या सभेनंतर अभिनेता व शिवसेना नेते किरण माने (Kiran Mane) यांनी एक्स (X) या सोशल मीडिया वरती भास्कर जाधव व खासदार राजन विचारे यांच्यासोबतच फोटो पोस्ट करत, ‘माझी ओरिजीनल शिवसेना !’ असे म्हणले. पुढे त्यांनी, ‘निष्ठावान शिवसैनिक राजन विचारेंच्या प्रचारासाठी…मा. भास्कर जाधव, खा. राजन विचारे यांच्यासोबत तुफानी बॅटिंग करायचा आनंद घेतला. चारपाच खतरनाक सिक्सर बसले. ठाण्यातल्या काही काचा खळ्ळकन् तडकल्या. जय महाराष्ट्र ! ‘ असे लिहत फोटो पोस्ट केला.

हे ही वाचा:

मराठी मतदारांना आवाहन करण्यामागे राजकीय हेतू आहे का? Chitra Wagh यांचा Renuka Shahane यांना सवाल

Uddhav Thackeray मतांसाठी लाचार, आज Balasaheb Thackeray असते तर… Devendra Fadnavis यांचे ताशेरे !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

 

 

Latest Posts

Don't Miss