Monday, May 20, 2024

Latest Posts

रक्षा खडसेंसाठी मुलगी “क्रिशिका” प्रचाराच्या मैदानात

रोड शोमध्ये क्रिशिका खडसे ही देखील रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले. क्रिशिका खडसे हिने नुकतान दहावीची परिक्षा दिली आहे.परिक्षनंतर ती आता आईच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी सर्वपक्षीयांची जोरदार तयारी सुरु आहेत. नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात चौथ्या टप्प्याचे ११ मतदारसंघात मतदान होणार आहे.भाजप खासदार रक्षा खडसे गेल्या दहा वर्षांपासून रावेर लोकसभा मतदारसंघाचे दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत आणि यंदा त्यांना तिसऱ्यांदा भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. मात्र यावेळी रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी त्यांची मुलगी प्रचाराच्या मैदानात उतरली आहे.

रक्षा खडसे यांच्यासाठी त्यांची मुलगी क्रिशीका खडसे ही आईच्या प्रचारासाठी सक्रिय झाली आहे. एकनाथ खडसे हे शरदचंद्र पवार गटाचे सक्रिय कार्यकर्ते होते मात्र त्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश न झाल्याने त्यांना आपल्या सुनेचा प्रचार करता येत नाही. रक्षा खडसे यांच्यासाठी उघड प्रचर करु शकले नसले तरी गावोगावी जात भेटीगाठी सुरु केल्या आहेत. मात्र त्यांच्यासाठी रक्षा खडसेेंच्या दोन्ही मुले आईसोबत प्रचार करत आहेत. आईला पुन्हा एकदा बहुमतांनी जिंकून यावं यासाठी मुलगी क्रिशिका आणि मुलगा गुरुनाथ सक्रिय झाले आहेत.

 

रक्षा खडसे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याने ते आपलं नशीब अजमावत आहेत त्यामुळे प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून जोरदार प्रचार सुरु आहे.९ मे रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी रावेर मतदारसंघात रोड शो घेतला. त्यावेळी रोड शोमध्ये क्रिशिका खडसे ही देखील रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले. क्रिशिका खडसे हिने नुकतान दहावीची परिक्षा दिली आहे.परिक्षनंतर ती आता आईच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे.

हे ही वाचा:

पराभवाच्या भितीनेच Narendra Modi कडून… Bhalchandra Mungekar यांचे ताशेरे

दिघे साहेबांची नक्कल करून अक्कल येत नसते, ४ जूननंतर कळेल ठाणेकर कोणाच्या बाजूने?Rajan Vichare कडाडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss