Sunday, May 19, 2024

Latest Posts

Dindori मधून JP Gavit, Harischandra Chavhan यांची माघार, Nashik मध्ये शांतिगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघात लढती होणार आहेत. बहुचर्चित नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातून एक मोठी बातमी येत असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) नेते जिवा पांडू गावित (JP Gavit) यांनी आता निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच, माजी आमदार हरिश्चंद्र चव्हाण (Harishchandra Chavhan) यांनीदेखील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

जे पी गावित यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “पक्षाच्या आदेशाचे पालन करून माघार घेतली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी करणार काम आहे. आदिवासी लोकांसाठी तुतारी चिन्ह नवीन असल्याने तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करणार,” असे ते म्हणाले.

तसेच, माजी आमदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीदेखील माघार घेतली असून त्यामुळे भाजपच्या नेत्या आणि महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी त्यांचे पुत्र समीर चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, ” भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिंडोरीतील उमेदवार भारती पवार यांच्यासाठी माघार घेतली आहे.”

दुसरीकडे, नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतिगिरी महाराज यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही नसल्याचे संगत निवडणुकीवर ठाम आहेत. माघार घेण्याची आजची शेवटची तारीख (सोमवार, ६ मे) असल्यामुळे आता त्यांना निवडणुकीतून माघार घेता येणार नाही. शांतिगिरी महाराजांच्या या निर्णयामुळे महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. महायुती ने मला पाठींबा द्यावा, अशी शांतिगिरी महाराज यांनी मागणी केली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

जेव्हा आनंद दिघेंनी राज ठाकरेंच नाव…. CM Eknath shinde यांचा गौप्यस्फोट

पराभवाच्या भितीने Narendra Modi यांच्या तोंडी हिंदू-मुस्लीम, पाकिस्तानची भाषा, Ramesh Chennithala यांचे टीकास्त्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss