Saturday, July 27, 2024

Latest Posts

महाविकास आघाडीच्या प्रचारसभा, शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन

देशभरात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024)सत्र चालू आहे. सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून ४ टप्पे पार पडले आहेत. आता लोकसभा निवडणुकीचे अजून ३ टप्पे शिल्लक असून प्रत्येक उमेदवार ऊन - पावसाची चिंता न करता जीवाचे रान करून आपल्या प्रचारात व्यस्त आहेत

देशभरात लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) सत्र चालू आहे. सात टप्प्यात ही निवडणूक होणार असून ४ टप्पे पार पडले आहेत. आता लोकसभा निवडणुकीचे अजून ३ टप्पे शिल्लक असून प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते ऊन – पावसाची चिंता न करता जीवाचे रान करून आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. २० मे रोजी लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडेल. हा पाचवा टप्पा मुंबई (Mumbai)आणि ठाणे (Thane)मधेही पार पडणार असून १८ मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील.

अवघ्या २ दिवसांचा कालावधी उरला असताना उमेदवारांची प्रचारासाठी धावपळ उडालेली दिसून येत आहे. परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी वाराणसी येथून उमेदवारीचा अर्ज भरला असून काल(१५मे बुधवार) त्यांची कल्याण (Kalyan)मध्ये सभा पार पडली असून घाटकोपरमध्ये (Ghatkopar)त्यांचा रोडशोही झाला. उद्या (१७मे शुक्रवार) राज ठाकरे (Raj Thackeray)आणि नरेंद्र मोदी यांची एकत्रित शिवाजी पार्क (Shivaji Park)मध्ये सभा पार पडणार असून आता उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray)त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सज्ज झाले आहेत.

ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांचा प्रचार करण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. आज (१६ मे गुरुवार) डोंबिवली व ठाणे मध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची जाहीर सभा पार पडेल. यावर्षी ठाणे मधून एकनाथ शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske)विरुद्ध शिवसेना उबाठा गटाचे राजन विचारे (Rajan Vichare)अशी लढत असून महाविकास आघाडीची राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे (शिवसेना एकनाथ शिंदे) विरुद्ध वैशाली दरेकर (शिवसेना उबाठा ) अशी लढत होणार असून वैशाली दरेकर यांच्याही प्रचारार्थ ही सभा होणार आहे. सभेत उद्धव ठाकरे व शरद पवार यांची प्रमुख भाषणे होणार असून खासदार संजय राऊत, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, नाना पाटोळे, तेजस्वी यादव, सचिन सावंत, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव उपस्थित राहतील. वैशाली दरेकर-राणे यांच्या प्रचारार्थ आज ५ वाजता डोंबिवली येथील भागशाळा मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार असून, राजन विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे पश्चिम येथे उद्धव ठाकरेंची सभा होईल.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss