Monday, May 20, 2024

Latest Posts

Solapur मध्ये होणार ‘चौरंगी’ लढत! आता MIM देखील निवडणुकीच्या रिंगणात

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जोरदार लढत होणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातही (Solapur Loksabha Constituency) महायुती आणि महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार उतरवले गेले आहेत. महायुतीकडून भाजपचे (BJP) राम सातपुते (Ram Satpute) हे मैदानात उतरणार असून महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या (Congress) प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडूनही (VBA) सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे सोलापूर मतदारसंघातून तिरंगी लढत होणार असे चित्र दिसत होते. परंतु, आता सोलापूरच्या जागेवर एमआयएम (MIM) देखील आपला उमेदवार उतरवणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांनी याबाबत बोलताना सांगितले, सोलापूर मधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी एमआयएम ठाम आहे. रमजान ईद नंतर सोलापूरमधील एमआयएमच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल.” असे ते म्हणाले. एमआयएमकडून सोलापूरमधून मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे नाव आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी एमआयएम सोलापूर शहराध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांनी रमेश कदम यांची भेट घेत होती. त्यामुळे रमेशं कदम यांचे नाव आघाडीवर आहे. आता सोलापूरमधून एमआयएमकडून कोणाचे नाव पुढे येणार हे लवकरच कळणार आहे.

प्रणिती शिंदेच्या अडचणीत वाढ होणार?

सोलापूर लोकसभा मदारसंघातून प्रणिती शिंदे या महाविकास आघाडी तर्फे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या समोर महायुतीकडून भाजपच्या राम सातपुते यांचे आव्हान असेल. सोलापूर मतदारसंघात हि लढत तुल्यबळ मानली जात होती. परंतु, वंचितने सोलापूरमधून उमेदवार उभा केल्याने प्रणिती शिंदे यांना मतविभाजणीचा फटका बसू शकतो. त्यात आता एमआयएमनेदेखील आपला उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केल्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss