Saturday, July 27, 2024

Latest Posts

PM Narendra Modi यांचा मुंबईत रोड शो, ‘हे’ मार्ग राहतील बंद

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी (Loksabha Election 2024)संपूर्ण देशभरात चालू आहे. चौथा टप्पा पार पडला असून अजून ३ टप्पे पार पडणे बाकी आहे. लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा मुंबईमध्ये (Mumbai) पार पडेल. २० मे रोजी लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडणार असून १८ मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी (Loksabha Election 2024) संपूर्ण देशभरात चालू आहे. चौथा टप्पा पार पडला असून आता पाचव्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा मुंबईमध्ये (Mumbai) पार पडेल. २० मे रोजी लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडणार असून १८ मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील. अवघे काही दिवस प्रचारासाठी उरल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी वेग धरला आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी कालच (१४ मे) वाराणसी येथून उमेदवारीचा अर्ज भरला असून आज (१५मे) मुंबईतल्या उमेदवारांनाच प्रचार करण्यासाठी हजार राहणार आहेत. यासाठी त्यांचा रोड शो देखील होणार आहे.

पंतप्रधानांच्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक मार्ग बंद राहणार आहेत. मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारासाठी १५मे आणि १७मे ला पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या मार्गांवर जोरदार शक्तिप्रदर्शन देखील होणार आहे. याबाबत मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपयुक्त राजू भुजबळ (Raju Bhujabal) यांनी माहिती दिली आहे. आज (१५मे )पंतप्रधानांच्या रोड शो मुळे मुंबईतील एल.बी.एस मार्ग दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. माहुल घाटकोपर रोडवरील (Mahul Ghatkopar Rode)आर बी कदम जंक्शन पर्यंत उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूची वाहतूक दुपारी दोन ते रात्री दहा पर्यंत बंद राहील. १४ आणि १५ तारखेला मुंबई वाहतूक पोलिसांकडून एल.बी.एस मार्ग व एल.बी.एस मार्गाला जोडणारा मुख्य रस्त्या पासून १०० मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग करण्यात आलेले आहे. नरेंद्र मोदी यांचा पहिला घाटकोपर ते मुलुंड दौऱ्यात रोडशो होईल. मुलुंड येथे खासदार मनोज कोटक (Manoj Kotak) यांचं तिकीट रद्द करून मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांना उमेदवारी दिली आहे. मुलुंड येथून मिहीर कोटेचा विरुद्ध शिवसेना उबाठा गटाचे संजय दीना पाटील (Sanjay Dina Patil) अशी लढत असणार आहे. या रोड शोचा फायदा मिहीर कोटेचा यांना होऊ शकतो.

तात्पुरता बदल केलेले मार्ग:

-अंधेरी घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर व दक्षिण मार्गावरील वाहतूक

-गोळीबार मैदान व घाटकोपर मेट्रो असताना जंक्शन येणारी वाहतूक

-हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स येथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन कडे येणारी वाहतूक

हे ही वाचा:

BJP-SHINDE सरकार दुर्घटना होण्याची वाट पाहतात का? GHATKOPAR HOARDING घटनेबाबत NANA PATOLE आक्रमक

अदिती रावच्या ‘त्या’ वॉकने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss