Saturday, July 27, 2024

Latest Posts

२६/११ च्या हल्ल्यात शहिद करकरेंच्या शरीरातील गोळ्या कसाबच्या की…, Prakash Ambedkar यांचे Ujjwal Nikam यांच्यावर आरोप

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. “२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामटे यांचा जीव घेणाऱ्या गोळ्या दहशतवादी कसाबच्या होत्या कि अन्य कुणाच्या? यासंदर्भात उज्ज्वल निकम यांनी खुलासा करावा,” असा सवाल त्यांनी केला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “उज्ज्वल निकम यांना मागील पत्रकार परिषदेत काही प्रश्न विचारले होते. हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे यांचा २६/११ च्या हल्ल्यात गोळ्या लागून मृत्यू झाला होता. त्या गोळ्या कोणाच्या बंदुकीतील होत्या? कसाब किंवा अबू इस्माईलच्या बंदुकीमधील होत्या का? यासंदर्भात त्यांनी खुलासा करावा, अशी विनन्ती त्यांना केली होती. देशाशी इमान राखत याच खुलासा कारण आवश्यक आहे.”

ते पुढे म्हणाले, “उज्ज्वल निकम यांनी केस चालवली, कसाबला दोषी करण्यात आलं होत. यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या खुनदेखील झाला होता. मात्र फायनल ऑर्डरमध्ये त्यांची नावचं नाही आहेत. त्यात कोर्टासमोर हि माहिती का आणली नाही ? कसाब आणि इस्माईलने वापरलेल्या बंदुकीतून त्यांनी कुठ्ल्यातरी धार्मिक संघटनेला वाचवण्यासाठी दबाव होता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याबाबत ते पुढे म्हणाले, “उज्ज्वल निकम आता तुम्ही उमेदवार आहेत. आता तुमच्यावर कोणाचा दबाव नसेल, त्यामुळे प्रामाणिकपणे सांगाव कि, कुणी त्यांच्यावर दबाव आणला होता का? त्या वेळच सरकार काँग्रेसचं होते. राष्ट्रवादीही सरकारमध्ये होते. हेमंत कारकरे आणि साळसकरांच्या सोबतची कॉन्स्पिरसी संदर्भात का नाही बोलत? याचा उल्लेख निकम यांनी करावा. ते राष्ट्रभक्त संघटनेचे पक्षाचे आहेत त्यांनी त्याचा मान राखून खुलासा करावा. त्यावेळी हे मुद्दे चर्चेत आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत होते. भाजप विरोधी पक्षात होता. त्यांनी हा मुद्दा काढला नाही,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss