Tuesday, May 21, 2024

Latest Posts

“फडणवीस राजकारणातलं कच्च मडकं त्यांना…,;Sanjay Raut यांनी Devendra fadnavis यांना डिवचलं

१५ तारखेला उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये विराट सभा होणार आहे. महाराष्ट्रात माविआ ३५ जागा जिंकणार आहे."असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी असा विश्वास व्यक्त केला

“१५ तारखेला उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये विराट सभा होणार आहे. महाराष्ट्रात माविआ ३५ जागा जिंकणार आहे.”असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी असा विश्वास व्यक्त केला तर “मुख्यमंत्र्यांनी धनुष्यबाण चोरला आहे त्यांना लोक मतदान करणार नाहीत”अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांच्यावर टीका केली.

आज नाशिक येथे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm eknathshinde) हे आज नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी नाशिक येथे येणार आहेत याबाबत प्रश्न विचारला असता “मुख्यमंत्री पुरवठा करायला येत असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Cm eknathshinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit pawar) यांनी टेम्पो भरुन पैसे आणून द्या.लोक त्यांना मतदान देणार नाही.”असे म्हणत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. तर”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात ठान मांडले आहे त्याचा काही उपयोग होणार नाही.”असं म्हणत पंतप्रधानांवर देखील निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले की, “अजित पवार यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्या आहेत.मुख्यमंत्री यांची धावपळ सुरू आहे पण ही अखेरची फडफड आहे. देवेंद्र फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहे.नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले”अशा शब्दात मुख्यमंत्र्यांसह फडणवीसांवर खोचक टोला लगावला. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांसाठी सक्रिय झाले असुन त्यांनी पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी जाहीर सभा घेतली त्यावर “ते कसले फतवे काढत आहेत लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया आघाडीला मतदान करा हा आता आम्ही फतवा काढतो”असं म्हणत राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. दरम्यान, काल ११ मे रोजी नंदुरबार येथे प्रियंका गांधी यांची जाहीर सभा होती. नंदुरबार येथे मविआ च जिंकणार आहे. प्रियंका गांधी आल्यामुळे नंदुरबारमध्ये परिवर्तन होणार असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हे ही वाचा:

VBA ला मतदान करून मत वाया घालू नका, Dr. Kalyan Kale यांचे मतदारांना आवाहन

ज्यांच्यावर टीका त्यांनाच ऑफर देण्याची Narendra Modi यांच्यावर नामुष्की, Nana Patole यांचे टीकास्त्र

Latest Posts

Don't Miss