लोकसभेच्या निवडणूकीच्या अंतिम टप्प्यासाठी आघाडी आणि महायुतीकडून आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. शेवटच्या टप्प्यासाठी प्रचारसभांच्या धडाका जोरदार सुरु आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे(raj thackeray)यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.तेव्हापासून महाविकास आघाडी राज ठाकरेंच्या निशाण्यावर आहे.
१२ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी महायुतीचे शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी कळवा येथे जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी “महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरुवात केली”असा शरद पवारांवर (sharadpawar)गंभीर आरोप करत टीका केली.त्यावर “महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरेंच स्थान काय आहे?”असे जोरदार प्रत्युत्तर देत प्रश्न उपस्थित केला.
आज नाशिक मध्ये शरद पवारांनी(sharad pawar)पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांना राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर प्रश्न विचारला असता “महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचे काय स्थान आहे? हे माहित नाही.नाशिक त्यांचा गड म्हणून सांगितल जातं.मात्र,ते नाशिकमध्ये कुठे दिसत नाही.”अशा शब्दात प्रत्युत्तर दिले.तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल केलेल्या रोड शो बाबत “नरेंद्र मोदी यांनी आधी आपला पक्ष सांभाळावा. मोदींच्या रोड शोमुळे लोकांना त्रास झाला”.असं म्हणत नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
दरम्यान, नाशिक मतदारसंघ हा सध्या चर्चेचा मतदारसंघ आहे. शेवटच्या टप्प्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. तर नाशिक मध्ये महायुतीकडून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे अशी लढत होणार आहे.
हे ही वाचा: