Sunday, May 5, 2024

Latest Posts

‘इंग्रजी बोलतो म्हणजे लय शहाणा झाला?’ Sharad Pawar यांचा Sujay Vikhe Patil यांना टोला

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmadnagar Loksabha Constituency) महायुतीचे (Mahayuti) उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना इंग्रजी भाषेच्या मुद्द्यावर आव्हान दिले होते. आता, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावर जोरदार टीका करत, ‘इंग्रजी बोलतो म्हणजे लय शहाणा झाला असं नाही,” असे वक्तव्य केले आहे. निलेश लंके यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना आव्हान देत, “मी इंग्रजीत जे भाषण केले, ते निलेश लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेतबोलून दाखवावे,’ असे वक्तव्य केले होते. यावर निलेश लंके यांनी प्रत्युत्तर देत, ‘माझ्या समोरच्या उमेदवाराने इंग्रजीतून भाषण करण्याची स्पर्धा लावली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान हवा. संसदेत खासदाराला आपल्या भाषेतून बोलता येते. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची किती बाजू लावून धरता हे महत्वाचे आहे” असे म्हंटले होते.

यावर आता शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली असून अहमदनगर येथील महाविकास आघाडीच्या सभेत त्यांनी सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, “मी इंग्रजी बोलतो म्हणजे मी खूप शहाणा झालो असं नाही. तुमचं इंग्रजी तुम्हाला लखलाभ असो. नगरमध्ये मंडळी सांगतात ५० वर्षे आम्ही लोकांची सेवा करतो. पण त्यांच्या पहिल्या पिढीने काम केलं, नंतरच्या पिढीने काय केलं? राहुरी कारखान्यावर राज्यभरातील मंत्रिमंडळातील अनेक लोक येऊन गेले. कारण सहकारातील उत्तम कारखाना कसा आहे तो पाहण्यासाठी मोठे नेते यायचे. पण, याच कारखान्याची विखेंनी काय वाट लावली हे मी सांगू इच्छित नाही.”

हे ही वाचा:

सत्ता जाण्याच्या भीतीने विरोधक घाबरले आहेत, Rahul Gandhi यांचा PM Modi, BJP वर हल्लाबोल

Sanjay Raut म्हणजे वाया गेलेली केस, Gulabrao Patil यांची खरमरीत टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss