Monday, May 20, 2024

Latest Posts

निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील ३५२ उमेदवारांचे ‘इतके’ अर्ज दाखल

राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र राज्याकरिता नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस. गंगवार जे भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आहेत तसेच विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा, सेवानिवृत्त भारतीय पोलीस सेवा यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा मंत्रालयात घेतला. महाराष्ट्रामध्ये एकूण ४८ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये सुरू असलेली तयारी, निवडणूकीचे कामकाज पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ, निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्था, मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून सर्व तयारीची माहिती यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी, यासह निवडणूक विभागाचे इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल झाले आहेत. सध्या राज्यभरात तसेचदेशात निवडणुकामय वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आता निवडणुकीच्या संदर्भात फॉर्म भरण्यासाठी शेवटचा दिवस बाकी असतांना तब्बल ४७७ फॉर्म्स भरण्यात आले आहेत.

राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भातील मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याचा ४ एप्रिल रोजी शेवटचा दिवस होता. ४ एप्रिलच्या सायंकाळपर्यंत एकूण ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघाचा सामावेश आहे. ४ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा २९ उमेदवारांचे ४२ अर्ज, अकोला २८ उमेदवारांचे ४०, अमरावती ५९ उमेदवारांचे ७३, वर्धा २७ उमेदवारांचे ३८, यवतमाळ- वाशिम ३८ उमेदवारांचे ४९, हिंगोली ५५ उमेदवारांचे ७८, नांदेड ७४ उमेदवारांचे ९२ आणि परभणी ४२ उमेदवारांचे ६५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

साताऱ्यातून कोणाला मिळणार उमेदवारी? सिल्वर ओकवर Sharad Pawar यांनी बोलावली महत्वपूर्ण बैठक

हिंगोलीत महायुतीने उमेदवार बदलला, Hemant Patil ऐवजी Baburav Kadam Kohalikar यांना उमेदवारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss