Sunday, May 19, 2024

Latest Posts

EXCLUSIVE CM Eknath shinde यांची इंडिया आघाडीवर टीका, पाकिस्तान धार्जिणेंची देशातील जनता…

इंडिया आघाडी  पाकिस्तानची भाषा करत आहेत. याचा अर्थ हे पाकिस्तान धार्जिणे असून हे हिंदुस्थान विरोधी आहेत. हे सिद्ध होत आहे." असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर ताशेरे ओढले.

“देशातील नागरिक म्हणून फारुक अब्दुला आणि त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करुन थांबणार नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवणार”, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath shinde) यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर ताशेरे ओढले. ६ मे रोजी “टाईम महाराष्ट्र” या वेबपोर्टलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath shinde) यांनी विशेष मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी काही विषयांवर भाष्य करत धक्कादायक गौप्यस्फोट देखील केले. “काश्मिर हे आपलं नंदनवन आहे, तो स्वर्ग आहे त्याला आपल्यासोबत ठेवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केलं आहे” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath shinde) यांनी कौतुक केले.

काही दिवसांपुर्वी राजनाथ सिंह (Rajnathsingh) यांनी “जर मोदींनी हॅट्रिक केली तर पाकव्याप्त काश्मिरचे नागरिक भारतात येतील” असे वक्तव्य केलं होतं. त्यावर  इंडिया आघाडीचे नेते फारुक अब्दुला (Farooq abdullah) यांनी असं म्हटंल की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत.” याबाबत टाईम महाराष्ट्र  वेबपोर्टलचे मुख्य संपादक राजेश काचरेकर (Rajesh Kochrekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांना प्रश्न विचारले असता,” या देशाचं हे दुर्देव आहे की, इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील फारुक अब्दुला हे पाकिस्तानची तळी उचलत आहेत आणि पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं गर्वाने म्हणत आहेत. इंडिया आघाडी  पाकिस्तानची भाषा करत आहेत. याचा अर्थ हे पाकिस्तान धार्जिणे असून हे हिंदुस्थान विरोधी आहेत. हे सिद्ध होत आहे.” असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath shinde) यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर ताशेरे ओढले.

 

पुढे ते म्हणाले की, “आता हे मजबूर भारत नाही तर हे मजबूत भारत आहे आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांच्या हातात आहे. पूर्वी पाकिस्तानचे लांघुचालन करत होते, पण आता घुसुन मारण्याची भाषा पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. पुलवामाचा बदला त्यांनी सर्जिकल स्ट्राईक बालाकोटला घेऊन केला. पूर्वी आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानात घेऊन जात होते. आता ती परिस्थिती बदलली आहे. ३७० कलम हटवले गेले आहे. लाल चौकात तिरंगा फडकतोय आणि आज ३७० कलम हटवल्यामुळे काश्मिरचा सुद्धा विकास होत आहे. काश्मिर हे आपलं नंदनवन आहे, तो स्वर्ग आहे त्याला आपल्या सोबत ठेवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केलं आहे, आणि हे सर्व देश विरोधी आणि पाकिस्तान धार्जिणे या सर्वांची या देशातील जनता कायमची धडगी बनवल्याशिवाय राहणार नाही.”

हे ही वाचा:

जेव्हा आनंद दिघेंनी राज ठाकरेंच नाव…. CM Eknath shinde यांचा गौप्यस्फोट

पराभवाच्या भितीने Narendra Modi यांच्या तोंडी हिंदू-मुस्लीम, पाकिस्तानची भाषा, Ramesh Chennithala यांचे टीकास्त्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss