Sunday, May 19, 2024

Latest Posts

भिवंडी दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली १४ जण अडकल्याची शक्यता

Bhiwandi Building Collapse : गजबजलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात काल अचानक दुमजली इमारत कोसळली आणि हो त्याचं नव्हतं झालं. घटनास्थळी त्वरित अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, ठाणे महानगरपालिकेचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने धाव घेतली.

Bhiwandi Building Collapse : गजबजलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात काल अचानक दुमजली इमारत कोसळली आणि हो त्याचं नव्हतं झालं. घटनास्थळी त्वरित अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, ठाणे महानगरपालिकेचे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने धाव घेतली. जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न काल करण्यात आले या इमारतीच्या ढिगार्‍यात काल तीन मृतदेह आढळून आले होते. आज पुन्हा या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली आणखीन दोन मृतदेह आढळले आहेत त्यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या ही पाचवर जाऊन पोहोचली आहे.

या घटनेनंतर संपूर्ण भिवंडी शहर हादरून गेले आहे. प्रशासनाच्या वतीने ढिगारा बाजूला करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. अचानक इमारत कोसळल्याने भिवंडी शहरात भीतीच वातावरण पसरलं आहे. आज आणखीन दोन मृतदेह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हाती लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोबतच आणखीन १४ जण ढिघाऱ्याखाली अडकण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

इमारतीच्या तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर व्यावसायिक गोदामे होती तर वरच्या मजल्यावर चार जणांचे कुटुंब वास्तव्यास होते. जेव्हा इमारत कोसळली तेव्हा अनेक मजदूर या गोदामांमध्ये मध्ये काम करत होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) दल आणि अग्निशमन दलासह विविध यंत्रणांचे कर्मचारी बचाव कार्यात शर्तीचे प्रयत्न करत आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः भिवंडी येथे जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी इमारत दुर्घटना स्थळाला भेट दिल्यानंतर त्यांनी भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या मजुरांची भेट घेऊन त्यांची चौकशी करून त्यांना धीर दिला. यावेळी या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या प्रेम आणि प्रिन्स या लहानग्यांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवर शासकीय खर्चात उपचार करण्यात येतील असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्री पदासाठी नवा दावेदार तयार होण्याची शक्यता – अमोल कोल्हे

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss