spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आदर्श ठेवीदारांचा मोर्चा, एकनाथ शिंदे म्हणाले…

आदर्श पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या ठेवी अडकल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. डीडीआर ऑफिससमोर थाळी नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या ठेवीदारांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचंही पाहायला मिळालं.

आदर्श पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या ठेवी अडकल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. डीडीआर ऑफिससमोर थाळी नाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या ठेवीदारांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचंही पाहायला मिळालं. याच प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी आदर्श पतसंस्थेमधील घोटाळ्याबाबत भाष्य केलं.

आदर्श पतसंस्थेची सर्व प्रॉपर्टी ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे देण्यात येतील, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. कोणाचेही पैसे बुडणार नाहीत, असं ते म्हणाले. खासदार जलील माझ्याशी भेटले होते. आदर्श पतसंस्था प्रकरणी जो भ्रष्टाचार झाला आहे. लोकांची फसवणूक झाली आहे. यामध्ये आदर्श पतसंस्थेच्या सर्व प्रॉपर्टी ताब्यात घेऊ आणि लोकांचे सगळे पैसे परत करु, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे पैसे परत मिळतील अशी अपेक्षा ठेवीदारांमध्ये निर्माण झाली आहे.आज मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे आदर्श पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक झाले. हजारोंच्या संख्येने ठेवीदार आंदोलन करत होते. मंत्र्यांनी येऊन ठेवीदारांना भेटावे, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली. मंत्री फक्त फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसण्यासाठी येथे आले आहेत का? इथे अनेक गरिब लोकांचा पैसे अडकले आहेत. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी येथे येऊन ठेवीदारांशी चर्चा करावी असं ते म्हणाले.

आदर्श पतसंस्थेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान यावेळी मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये झटापट पाहायला मिळत आहे. तर इम्तियाज जलील यांना देखील पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि जलील यांच्यात देखील झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मोर्चेकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केल्याचं समजतं. आदर्श नागरी पतसंस्थेचे व संचालक मंडळाच्या मालमत्तेचे निलामी करुन गोरगरीब, वयोवृद्ध, कष्टकरी व शेतकरी ठेवीदारांचे हक्काचे पैसे देण्यात यावे, आत्महत्या केलेल्या ठेवीदारांच्या नातेवाईकांना पाच लाखाची तात्काळ मदत करण्यात यावी, रुग्णालयात भरती ठेवीदारांच्या संपूर्ण उपचाराचा खर्च शासनाने करावा तसेच महाघोटाळ्यातील फरार आरोपींना आणि त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना अटक करण्याचे आदेश निर्गमित करण्यात यावे.” त्यामुळे आता आदर्श पतसंस्थेची मुख्यमंतरूणी किती प्रमाणात ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसतायत हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा: 

संभाजीनगरमधून एकनाथ शिंदेंनी केली घोषणा, मराठवाड्याला ५९ हजार कोटींचं मिळणार पॅकेज

शरद पवारांच्या गटाचे पिंपरी-चिंचवड येथे नवीन कार्यालय, कोण करणार उदघाटन ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss