Friday, March 1, 2024

Latest Posts

चिपी विमानतळावरून महत्वाच्या शहरात विमानसेवा सुरु होणार

सिंधुदुर्ग जिह्ल्यातील (Sindhudurga District) बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून (Chipi Airport) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे.

सिंधुदुर्ग जिह्ल्यातील (Sindhudurga District) बॅ. नाथ पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून (Chipi Airport) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. नवीन वर्षात प्रवाशांना एक गिफ्ट मिळणार आहे. फ्लाय १९ या कंपनीने पुढाकार घेऊन चिपी विमानतळावरून काही महत्वाच्या शहरांमध्ये विमान सेवा चालू करण्यात येणार आहे. या विमानतळावरून बंगळुरु, हैदराबाद आणि जळगाव या ठिकाणी सेवा सुरु करण्यात येणार आहे. तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे आणि हवाई उड्डाण मंत्रालयाच्या आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर मुंबई आणि पुणे ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिह्ल्यात मागील काही महिन्यांपासून मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमान सेवेचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री रविंद्र चव्हाण त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमानसेवा सुरु आहे. पण काही कारणाने ही विमानसेवा अनियमित झाली होती. त्यामुळे प्रवाशाना रेल्वे आणि रस्ते मार्गाने कोकणात यावे लागत होत. काहीजण गोव्याला उतरून मग कोकणात येत होते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी विमानतळावरील प्रवासी सेवेसाठी दिल्लीमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई हि विमानसेवा आता नियमितपणे चालू करण्यात येणार आहे. एअर अलांयन्स व इंडीगो या दोन विमान कंपन्यांच्यामार्फत ही विमान सेवा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

पर्यटनाच्या दृष्टीने विमानसेवा खूप महत्वाची आहे. मात्र अनियमित विमान सेवेवर राजकीय नेत्यांनी देखील लक्ष देणे फार महत्वाचे आहे, असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. चिपी विमानतळावरून ब्लु फ्लॅग मानांकन मिळालेला भोगवे समुद्र किनारा ८ किलोमीटर अंतरावर आहे तसेच मालवण सिंधुदुर्ग किल्ला १४ किलोमीटर तर वेंगुर्ले समुद्र किनारा ३५ किलोमीटर अंतरावर आहे. या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी असते.

हे ही वाचा:

CM EKNATH SHINDE: मुंबईत विशेष मुलांसाठी आणखी दोन प्रारंभिक उपचार केंद्र सुरू करणार

‘सिंघम ३’च्या सेटवर अजय देवगनचा अपघात,चित्रपटाचं शूटिंग थांबलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss