Monday, May 20, 2024

Latest Posts

अरुण गवळीच्या पत्नीची सुटका नाहीच, ‘या’ प्रकरणी सत्र न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार

गँगस्टर अरुण गवळीची पत्नी आशा गवळी यांना सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तिला दोषमुक्त करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. ग्लोब ऑटो इलेक्ट्रिकल्सच्या कर्मचार्‍यांसाठी १.७७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तिला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

Pitrupaksh shradh 2022 :- जाणून घ्या… श्राद्धाचे अनेक प्रकार

अरुण गवळी याच्या अखिल भारतीय कामगार सेनेसह अरुण गवळी आणि आशा गवळी यांच्याविरुद्ध मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत २००६ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या आरोपातून दोषमुक्त करण्यास आशा गवळीला न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आशा गवळीच्या अडचणीत भर पडली आहे. हे प्रकरण ग्लोब ऑटो इलेक्ट्रिकल्स आणि १९८१ मध्ये कंपनी बंद झाल्यावर नोकऱ्या गमावलेल्या ४६९ कर्मचाऱ्यांतील वादाशी संबंधित आहे. या कर्मचार्‍यांच्या वतीने खटला लढण्यासाठी पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आली.

हेही वाचा : 

‘ … जे पेरलंय, ते उगवतंय’, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा खोचक टोला

या प्रकरण दरम्यान आशा गवळी यांनी न्यायदंडाधिकारी न्यायालयात मुक्ततेसाठी याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळल्यानंतर आशा गवळीने सत्र न्यायालयात गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यासाठी धाव घेतली होती परंतु सत्र न्यायालयाने तिला दोषमुक्त करण्यास नकार दिला आहे. सत्र न्यायालयाने आशा गवळींना दोष मुक्तीच्या अर्जाला विरोध करत, तपासात रेकॉर्डवरील पुराव्यावरुन असे सिद्ध होते की १५० बेअरर चे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे तयार करण्यात आले होते. त्या धनादेशांवर आरोपी क्रमांक १ अरुण गवळी आणि आरोपी क्रमांक २ आशा गवळी यांच्या स्वाक्षरी होत्या.
त्याद्वारे ते धनादेश अखिल भारतीय सेनेच्या कर्मचाऱ्यांमार्फत रोखण्यात आले आणि बँकेतून काढलेली रक्कम आरोपी क्रमांकला १ ला देण्यात आली. ती रक्काम कर्मचाऱ्यांनी वितरित करणे आवश्यक होती असे नरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

अभिनेता आणि प्रभासचे काका कृष्णम राजू यांच्या निधनाने दक्षिण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली

Latest Posts

Don't Miss