अकोल्यातील बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची आंतरवलीमध्ये भेट

राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.

अकोल्यातील बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची आंतरवलीमध्ये भेट

राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच महायुतीचा फॉर्मुला देखील जाहीर केला जाणार आहे. त्यातच काल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी रात्री उशिरा आंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली. सगळीकडे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीची साथ सोडणार अश्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आंबेडकरांनी मनोज जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मनोज जरांगे यांची प्रकाश आंबेडकर यांनी काल मध्यरात्री आंतरवली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीवर मनोज जरांगे म्हणाले, माझा राजकारणावर विश्वास नाही. समाजाने नाही म्हटले तर नाही. पण समाज हो म्हटला तर इतक्या ताकदीने उतरणार की, त्यांनी मला आंदोलनात जितके हलक्यात घेतले होते तसे राजकारणात घेऊ नयेत असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. तसेच, वंचितकडून प्रस्ताव आला असला तरी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार समाजाच्या हाती दिले आहेत. गावागावातील बैठकीचे निर्णय कळतील. त्यामुळे समाजाच्या म्हणण्यानुसार ३० तारखेला चित्रच स्पष्ट करू. गावा-गावातून अपक्ष उमेदवार देण्याबाबत निर्णय घेवू, माझा जन चळवळीवर विश्वास आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर आज प्रकाश आंबेडकर अकोल्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीपूर्वी मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यांच्यात आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे वेळ आल्यावर सांगेन, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर यांच्यात अनेक चर्चा झाल्या. मात्र यामध्ये महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला चार जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र हा प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांना मान्य नसल्याने महाविकास आघाडीसोबत काडीमोड होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

IPL 2024: Mumbai Indians टीममध्ये Suryakumar Yadav असणार की नाही?

भाजपकडून स्टार प्रचारकांची पहिली यादी जाहीर, मोदींसह गडकरी, फडणवीस करणार प्रचार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version