Saturday, April 27, 2024

Latest Posts

IPL 2024: Mumbai Indians टीममध्ये Suryakumar Yadav असणार की नाही?

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) आयपीएलमध्ये पहिला सामना २४ मार्च रोजी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध होता. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्सला दरवर्षीप्रमाणे आयपीयलच्या पहिल्या मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्स विरुद्ध ६ धावांनी  पराभव झाला. त्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ची कमी जाणवली. सूर्यकुमार यादवला दुखापत झालयामुळे तो पहिली मॅच खेळू शकला नाही. बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडेमीने (Bengaluru National Academy ) दुसऱ्या मॅचसाठी पण फिटनेस प्रमाणपत्र दिले नाही .

गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध पराभव झाल्यामुळे मुंबई इंडियन्सला हैदराबाद विरोधातील मॅचपूर्वी धक्का बसला आहे. उद्या होणाऱ्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार नाही.  सूर्यकुमार यादवची फिटनेस टेस्ट २१ मार्च ला केली होती. जून महिन्यात टी-२० वर्ल्डकप (T-20 World Cup) होणार आहे. सूर्यकुमार यादव टी-२० मधील भारताचा आघाडीचा फलंदाज असल्यानं त्याच्या फिटनेसबाबत बीसीसीआय धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे कोणतीच घाई न करता त्याच्या फिटनेसची पूर्णपणे काळजी घेण्यात येणार आहे. काही महिन्यापूर्वी सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरती असताना त्याला दुखापत झाली होती. सूर्यकुमारला हर्नियाचा त्रास असल्याचं सांगण्यात आले होते.

सूर्यकुमार यादवने जानेवारीमध्ये जर्मनीला जाऊन उपचार घेतले होते. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात हैदराबाद मध्ये सामना होणार आहे. उद्याच्या मॅचमध्ये मुंबई आणि हैदराबाद टीमचा विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असेल. सूर्यकुमार फिट नसल्यमुळे मुंबई इंडियन्स ला मोठा धक्का बसला आहे. आता मुंबई इंडियन्स सनरायजर्स हैदराबाद विरोधात कोणत्या खेळाडूला संधी देणार याची चाहत्यांना उत्सुकता राहिली आहे. सूर्यकुमार यादव टी-२० मधील आक्रमक खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे.

हे ही वाचा:

शिंदे गटाला जेवढ्या जागा तेवढ्याच आम्हाला द्या, छगन भुजबळांची मागणी

खैरे दानवे वाद अखेर मिटला, वाद संपल्यानंतर अंबादास दानवेंनी केली मोठी घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss