Saturday, March 2, 2024

Latest Posts

बीडची दंगल भुजबळांनी घडवली; मनोज जरांगेंचा आरोप

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सगळीकडे गाजत आहे.

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सगळीकडे गाजत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौरा करत आहेत. या दौऱ्यामध्ये ते महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जाऊन सभा घेत आहेत. हे सगळं चालू असताना मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप चालू आहेत. छगन भुजबळ (chhagan bhujbal) महाराष्ट्रला लागलेला कलंक आहे. याला फक्त पाहुण्याचा पुळका येतो, असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) केला आहे. अंतरवलीतील (Antarwali Sarathi) लोक घरात कोंडून मारले, तेव्हा हा झोपला होता का? भेदभाव करत नाही तर मग अंतरवालीत का आला नाही, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे. बीड मधील दंगल देखील यांनीच घडवून आणली. याला बळ देऊ नका, असे आव्हान मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्य सरकारला केले आहे.

छगन भुजबळ यांना बळ देऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, यांचं एकूण तुम्ही आमच्या लोकांना अटक केली. यांचं ऐकून मराठ्यांच वाटोळं करू नका. भुजबळांनी महाराष्ट्र्र सदन खाल्लं, तरी केस तुम्ही मागे घ्यायला लागलेत. सगळा महाराष्ट्र खाल्ला आहे. फडणवीस साहेब बुजबळांना बळ द्यायला लागले असं दिसत आहे. भुजबळ बोलला त्यामुळेच गावा गावात जातीय तणाव निर्माण होत आहे,असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. आम्ही शांततेच आव्हान करतो आणि तुम्ही लोकांना भडकवतात. तुम्ही जर असंच करत राहिले तर आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल. हे मराठ्यांच्या किती हिताचे आहेत, हे मराठयांना माहीत आहे. सगळं खाल्लं. फडणवीस साहेब याला बळ देत असल्याने भाजपसाठी हा चांगला संदेश नाही. आरक्षण ही केंद्र आणि राज्याची सुविधा आहे. यांचं ऐकू नये. हा माणूस प्युअर जातीयवादी आहे. हा लहान जातींना सुद्धा आरक्षण खाऊ देत नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

धनगर, वंजारी यांच्या आरक्षणाला आम्हाला आरक्षण दिलं तर धक्का लागत नही, हा कामातून गेलेला आहे. भुजबळ मंत्री म्हणायच्या लायकीचे नाहीत. आम्हाला आश्वासन देण्यासाठी तिन्ही गटाचे लोक होते, आमच्याकडे सगळे कागदांचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. एक महिन्यात गुन्हे मागे घेऊ असं सांगितलं, अटक करणार नाही असं सांगितलं. भुजबळांचं ऐकून निष्पाप पोर राज्यभर अटक केली, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

हे ही वाचा:

‘अॅनिमल’च्या यशानंतर रामाच्या भूमिकेत दिसणार रणबीर कपूर

सर्वसामान्यांना दिला महागाईने मोठा झटका, वित्त मंत्रालयाकडून आकडेवारी जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss