Saturday, July 27, 2024

Latest Posts

कांदा निर्यात दरात मोठी घसरण

सध्या कांद्याच्या मुद्द्यावरून सगळीकडे वातावरण चांगलेच तापले आहे.

सध्या कांद्याच्या मुद्द्यावरून सगळीकडे वातावरण चांगलेच तापले आहे. कारण केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह (Farmers) विविध शेतकरी संघटना या निर्णयाच्या विरोधात आक्रमक झाल्या आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाले आहे.

केंद्र सरकारने १७ डिसेंबर रोजी कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे भावुक बाजारात कांद्याचे भाव ५० टक्क्यांनी घसरले आहेत. खरीप कांद्याचा पुरवठा वाढल्यामुळे येत्या आठवडाभरात भाव स्थिर राहण्याची किंवा किंचित घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. लासलगाव एएमपीसीमध्ये कांद्याची सरासरी घाऊक किंमत २० ते २१ रुपये प्रति किलो आहे. जी निर्यातबंदीच्या आधी ३९ ते ४० रुपये प्रति किलो होती. केंद्र सरकारनं प्रथम कांद्यावर किमान निर्यात मूल्य (एमईपी) लागू केले. त्यानंतर ७ डिसेंबर रोजी निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्यातबंदी जाहीर झाल्यानंतर लगेचच कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आली आहेत. सरकारने ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी घालण्याच्या निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला देखील मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यानंतर आता सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. अश्याच पद्धतीने सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी अशी मागणी होत आहे. सरकारने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा आहि मागणी शेतकरी करत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी हळूहळू त्यांचे पीक बाजारात आणत आहेत.

लासलगाव बाजार समितीत ६ डिसेंबर रोजी लाल कांद्याची सरासरी किंमत ३९.५० रुपये प्रति किलो होती. तर सर्वाधिक किंमत ४५ रुपये प्रति किलो होती. मात्र, आता कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. सध्या प्रतिकिलो कांद्याला २१ ते २५ रुपयांचा दर मिळत आहे. निर्यातबंदीनंतर सरासरी किंमत ४७ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर सर्वोच्च किंमत ४४ टक्क्यांनी कमी झाली आहे. घाऊक बाजारातील कांद्याच्या पुरवठ्याच्या आकडेवारीवरुन खरीप कांद्याची आवक सरकारच्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. दरम्यान, लासलगाव बाजारात या महिन्यात १९ डिसेंबरपर्यंत ३.६६ लाख टन लाल कांद्याची आवक झाली आहे. तर संपूर्ण डिसेंबर २०२२ मध्ये एकूण आवक ३.६९ लाख टन होती.

हे ही वाचा:

IPL 2024 Auction, लिलावात ‘या’ खेळाडूंना मिळाले इतके पैसे…

हेडगेवार स्मृतीस्थळाच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss