Monday, May 20, 2024

Latest Posts

यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन

अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकारकडे केल्या जातात. परंतु त्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्यासाठी आज शिवसेनेकडून (उद्धव ठाकरेंची शिवसेना) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकारकडे केल्या जातात. परंतु त्या मागण्या पूर्ण होत नाहीत त्यासाठी आज शिवसेनेकडून (उद्धव ठाकरेंची शिवसेना) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळावे त्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेकडून आज यवतमाळ (Yavatmaal) जिल्यात शेतकऱ्यांनसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. कापसाला प्रती क्विंटल (quintal) १० हजार रुपये हमी भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याचबरोबर कापसाची त्वरित खरेदी चालु करावी.

त्यानंतर शेतकऱ्यांची दुसरी मागणी आहे की, सोयाबीन प्रती क्विंटल ७ हजार रूपये हमी भाव मिळावा. या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. या आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेच्या वतीने एक महिन्यापूर्वी ९ जानेवारी ला महआक्रोष मोर्चा काढण्यात आला होता. आणि त्या मोर्चाचे नेतृत्व अरविंद सावंत यांनी केले होते. त्या मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा उपस्थित होते. १ महिन्यानंतर ही शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही. त्या साठी हे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत.

शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या (Major demands) –

प्रती क्विंटल १० हजार रुपयांचा कापसाला हमी भाव मिळावा
कापसाची त्वरित खरेदी चालु करावी
सोयाबीन प्रती क्विंटल ७ हजार रुपये हमी भाव मिळावा
हरभरा आणि तुरीची ऑनलाईन नोंदणी सुरू करावी
हरभरा आणि तुरीची त्वरित खरेदी चालु करावी

यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुक्यांमध्ये होणारे चक्का जाम आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आहे. आजचे हे शिवसेनेचे आंदोलन उग्र स्वरूपात होण्याची शक्यता आहे. जिल्यामध्ये वर्चस्व कायम ठेवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. यवतमाळ जिल्ह्यातील मंत्री संजय राठोड, वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी, महागाव हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात गेल्यामुळं यवतमाळमध्ये ठाकरे गटाचे वर्चस्व कमी झाले होते.

हे ही वाचा : 

जाणून घ्या आत्तापर्यंतचे Maharashtra Bhushan पुरस्काराचे मानकरी

मोठी बातमी! आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर, ‘टाईम महाराष्ट्र’ने आधीच दिल होत वृत्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss