Tuesday, April 16, 2024

Latest Posts

राज्यातील हवामानात बदल,राज्यात ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत.

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात थंडी पडत आहे. अनेक दिवसांपासून दुपारच्या वेळेस कडाक्याचे ऊन पडत असल्याने सगळीकडे वातावरण चागंलेच बिघडले आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम शरीरावर होत आहे. दरम्यान, राज्यात २५ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी या कालावधीत संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यातील वातावरणात बदल होणार आहे. पुढील पाच दिवसांमध्ये वीजा आणि गडगडाटीसह मध्यम पावसाबरोबर गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावती, नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता नसून सगळीकडे आकाश निळेभोर राहणार आहे. किमान व कमाल अश्या दोन्ही तापमानात सरासरीच्या खाली १६ -१८ व ३० डिग्री तापमान राहणार आहे. त्यामुळे वातावरण आल्हादायक जाणवण्याची शक्यता आहे. सध्या राज्यभरात सगळीकडे पहाटे कडाक्याची थंडी आणि दुपारच्या वेळेस कडाक्याचे ऊन पडत आहे. संध्याकाळी तापमानात बदल जाणवत आहे. राज्यात हंगामी कार्यकाळ जाणवत असल्याने पाणी टंचाईच्या काळात रब्बी शेत-पिकांना काहीशी मदत होणार आहे.

२६ आणि २७ फेब्रुवारीला दोन दिवस खान्देश नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. ढगाळ वातावरण असल्याने गडगडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह कमी प्रमाणात पावसाची शक्यता आहे. जळगावमध्ये काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जालना, हिंगोली, परभणी ,नांदेड या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

Sridevi Death Anniversary : ​​श्रीदेवीच्या पुण्यतिथीला खुशी कपूर झाली भावूक, फोटो शेअर करत…

सध्याचा काळ वैचारिक संघर्षाचा, पुन्हा जनतेचे राज्य आणू… रायगडावरुन शरद पवार यांची गर्जना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss