Sunday, May 19, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यासाठी रवाना

यावेळी गडचिरोलीत पुरस्थितीचा ते आढावा घेणार आहेत

गडचिरोली :  यावेळी मुख्यमंत्री अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार. सध्या गडचिरोलीत पावसाचं थैमान सुरू आहे. गेले काही दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीतील जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तेथील लोकांना स्थलांतरित करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पावसामुळे शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. पूरपरिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्री मुंबई विमानतळावरून नागपूर आणि तिथून गडचिरोली असा त्यांचा आजचा दौरा असणार आहे. एकनाथ शिंदे हे गडचिरोली चे पालकमंत्री सुद्धा राहिले आहेत. आता ते मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांद गडचिरोली येथे जात आहेत. म्हणून हा दौरा महत्वाचा असणार आहे. तेथील पूरजन्य परिस्थितीची ते पाहणी करतील. मुख्यमंत्री दुपारी ४ वाजता गडचिरोलीत पोहोचतील अशी माहिती मिळतेय. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह ते आढावा बैठक घेणार आहेत.
दरम्यान, आज सुप्रीम कोर्टाने शिंदे आणि शिंदे गटातील १६ आमदारांना दिलासा दिला आहे.
११ जुलै रोजी शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. आज सोमवारी सुट्टीनंतर न्यायालयाच्या कामकाजाला नियमितपणे सुरुवात झालेली आहे.  शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाकडून महत्वाचा निर्णय देण्यात आला आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत त्यांच्यावरच कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे पुढच्या सुनावणीत काय होतंय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Latest Posts

Don't Miss