Sunday, May 19, 2024

Latest Posts

ऐरोलीत शाळेच्या विरोधात पालकांच्या तक्रारी

नवी मुंबईमधील न्यू होरायझन पब्लिक स्कूल व न्यू होरायझन स्कॉलर स्कूल या विद्यालयाच्या विरोधामध्ये पालकांनी तक्रार केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाला अर्ज लिहिला आहे.

नवी मुंबईमधील न्यू होरायझन पब्लिक स्कूल व न्यू होरायझन स्कॉलर स्कूल या विद्यालयाच्या विरोधामध्ये पालकांनी तक्रार केली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नवी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण विभागाला अर्ज लिहिला आहे. त्या पत्रामध्ये पालकांनी विद्यालयाच्या विरोधात तक्रारी नोंदविल्या आहेत आणि शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आंदोलनाचा मार्ग पत्कारला आहे. शाळेतील पालकांना वारंवार अनेक विषयी तक्रारी आहेत आणि त्यांना वारंवार त्या तक्रारीचा सामना करावा लागत आहे. शाळेत तक्रार करून सुद्धा शाळेकडून समानधनकारक उत्तर न मिळाल्यामुळे पालकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

पालकांच्या तक्रारी

  • शाळेच्या फी मध्ये १५ टक्के वाढ.
  • शिक्षक पालक संघाची स्थापना न करणे.
  • फी भरलेल्या नसल्यास विद्यार्थ्यांच्या शाळेचे दाखले न देणे आणि परीक्षेला बसू न देणे.
  • फी भरलेली नसल्यास पालकांकडून प्रति दिवस १०० रुपये आकाराने.
  • शासनाने लॉकडाऊन कालावधीमध्ये सवलत दिलेली १५ टक्के फी पालकांकडून वसूल करणे.
  • फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देणे.
  • १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना NCRT ची पुस्तके न देणे.
  • १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकातील अभ्यासक्रम शाळा स्वतः ठरवत असून त्या पुस्तकांची किंमत जास्त आहे.
  • पालकांना विशिष्ट दुकानातून गणवेश आणि पुस्तके आणण्याची सक्ती करणे.
  • शाळेतील शिक्षक शाळा सोडून जात आहेत. (शिक्षकांची कमतरता)

अश्या अनेक तक्रारी शाळेतील पालकणांच्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या तक्रारींची दखल घेत नसल्यामुळे तसेच शाळेकडून त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्यामुळे पालक शाळेच्या परिसरामध्ये आंदोलन करत आहेत. या सर्व तक्रारी आणि आंदोलन केल्यानंतर न्यू होरायझन स्कॉलर स्कूल या शाळेची बैठक २३ मार्च २०२३ रोजी आणि न्यू होरायझन पब्लिक स्कूल या शाळेची बैठक दिनांक २७ मार्च २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शाळेकडून रचना कामत, श्री निकोलस व श्रीम. आबा जाधव यांनी पालकांच्या तक्रारी विधायि निर्णय घेण्याचे सर्व अधिकार संस्थेला असतात असे सांगण्यात आले.

हे ही वाचा : 

अरबी समुद्रातील संशयास्पद बोटीचा पाकिस्तानी कनेक्शन नसल्याचा दावा

Ram Navmi 2023, ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss