अकोल्यात लावली संचारबंदी, अखेर परिस्थिती नियंत्रणात

काल दिनांक १३ मे रोजी अकोल्यात रात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अकोल्यात लावली संचारबंदी, अखेर परिस्थिती नियंत्रणात

काल दिनांक १३ मे रोजी अकोल्यात रात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही हाणामारी इतकी तुफान होती की दोन्ही गटात जोरदार दगडफेक देखील झाली आणि त्यांनतर जाळपोळ करण्यात आली जवळपास १०० बाईकस्वार अचानक रस्त्यावर उतरले. त्यांनी दहशत माजवण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना या संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. किरकोळ वादातून परिस्थिती इतकी बिघडली की दोन्ही गटांमध्ये राडा झाला.

सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह संवादामुळे अकोल्यात तणावाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे अकोल्यामध्ये सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात शुकशुकाट हा पसरला आहे. तसेच सर्वत्र बाजारपेठेसह दुकाने, पेट्रोल पंप बंद आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, शांतता कायम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले.

जुने शहरातील जय हिंद चौक, हरिहरपेठ, अक्कलकोट भागात १३ मे रोजी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास दोन गटात दगडफेक व हाणामारीची घटना घडली. जवळपास १०० बाईकस्वार अचानक रस्त्यावर उतरले. त्यांनी दहशत माजवण्यास सुरुवात केली. त्याची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी येत समाजकंटकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही ते हटण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला. पोलीस जमावाला पांगवत असताना पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना या जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांनी हवेत १२ राऊंड फायरिंग केली. रात्री उशिरा जिल्हाधिकारी नीमा अराेरा यांनी संचारबंदी लागू केल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.

हे ही वाचा : 

एका Instagram पोस्टमुळे अकोल्यातील हिंसा भडकली? कारण आलं समोर

Nashik, देवीच्या दर्शनाला सप्तशृंगी गडावर जाताय? तर व्हा वेळीच सावध

Karnataka च्या निकालानंतर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया, भारत जोडो यात्रेचा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version