Saturday, July 27, 2024

Latest Posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली मंत्री पियुष गोयल यांची भेट

कांद्याच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेतली.

कांद्याच्या प्रश्नावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेतली. केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, पियुष गोयल यांनी फडणवीसांना आश्वासन दिले आहे. केंद्र सरकराने कांदा निर्यातीवर बंदी आणल्यामुळे शेतकरी संतापले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केली.

कांदा निर्यातबंदीनंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचं गोयल यांना भेटून निवेदन दिले आहे. सह्याद्री अतिथीगृहावर पियुष गोयल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीसांनी स्वत: ही माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे प्रश्न कांदा, कापूस व सोयाबीन या विषयांवर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासह एक सकारात्मक बैठक सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे झाली. पियुष गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत दिले. कांदा प्रश्नावर दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याच्यासह नाशिकमधील व्यापारी या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्राने कांदा निर्यात बंदी केल्याने जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निघेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मागील आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिठामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी चांगलाच झोडपलेला असतांना त्यातून शेतकरी कसाबसा उभा राहू पाहत होता मात्र पुन्हा एकदा केंद्र सरकारने कांदा निर्यतींवर बंदी घातली. आशिया खंडातील जागतिक बाजारपेठ म्हणून उल्लेख असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव ही देखील नाशिक जिल्ह्यातच आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

हे ही वाचा:

अवकाळी पावसाचा धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, द्राक्ष उत्पादक संकटात

POLITICS: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देऊ नका- CHHAGAN BHUJBAL

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss