Tuesday, May 21, 2024

Latest Posts

डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाचा निकाल; दोघांना जन्मठेप तर तिघे निर्दोष

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा ११ वर्षानंतर निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून २ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तीन जणांना निर्दोष सिद्ध केले आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर(Dr.Narendra dabholkar) यांच्या हत्या प्रकरणाचा ११ वर्षानंतर निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून २ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तीन जणांना निर्दोष सिद्ध केले आहे. पाच पैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी विरेंद्र तावडे, ऍड संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.

२० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात दिवसाढवळ्या ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.डॉ.विरेंद्र तावडे हा या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी होता. कट रचल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे याला न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आल्याने दाभोलकर कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते.सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या. दोन्ही हल्लेखोरांना न्यायालयानं दोषी धरलं आहे आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दाभोलकर हत्या प्रकरणाला ११ वर्ष उलटल्यानंतर निकाल लागला. मात्र दोषी ठरवण्यात आलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे खुनाच्या 302 कलमातंर्गत दोषी ठरले. त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि 5 लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल.असे हे त्यांना सांगण्यात आले आहे.

डॉ.विरेंद्र तावडे, ऍड संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तिघांवर दाभोलकरांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. पण त्यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्या विरोधात पुरावे नसल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं. त्यामुळे दाभोलकर हत्या प्रकरणात हल्लेखोरांना शिक्षा झाली आहे. पण कट रचल्याचा आरोप असणाऱ्या तिघांची सुटका झाली आहे.

हे ही वाचा:

पराभवाच्या भितीनेच Narendra Modi कडून… Bhalchandra Mungekar यांचे ताशेरे

दिघे साहेबांची नक्कल करून अक्कल येत नसते, ४ जूननंतर कळेल ठाणेकर कोणाच्या बाजूने?Rajan Vichare कडाडले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss