Friday, April 19, 2024

Latest Posts

Chhagan Bhujbal यांच्या नाशिक जिल्ह्यात Manoj Jarange यांची एन्ट्री

मराठा आरक्षणाचे प्रणेते मानले जाणारे मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. या दौऱ्यादरम्यान आज म्हणजेच ८ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे हे छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात पोहोचणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील कळवण, दिंडोरी, बागलाण, मालेगाव आणि नांदगाव या तालुक्यांचा दौरा मनोज जरांगे करणार आहेत. या दौऱ्यात मराठा समाजाच्या वतीने जरांगे यांचे जल्लोषात स्वागत करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच, मनोज जरांगे हे नाशिक येथील प्रसिद्ध मंदिर असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शन सुद्धा घेणार आहेत.

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यांना घेऊन छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील नेहमीच वादात येताना दिसून आले आहेत. प्रत्येक सभेत दोघेही एकमेकांवर वार-पलटवार करताना पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकारने काढलेल्या अध्यादेशाला छगन भुजबळ यांनी विरोध केला आणि नेमके आता मनोज जरांगे हे छगन भुजबळ यांच्या नाशिक जिल्ह्यात धडकणार आहेत. महाराष्ट्राचा दौरा करत असताना मनोज जरांगे नाशिक येथे नेमकं काय बोलणार आहेत, याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणासाठी सरकारने नवीन अध्यादेश काढला मात्र या अध्यादेशाची अंमलबजावणी होताना मात्र दिसून येत नाही. याच गोष्टीमुळे मनोज जरांगे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर ९ फेब्रुवारीपर्यंत जर या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नाही तर १० फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईतील दादर येथून नाशिक त्यानंतर सटाणा मार्गे साल्हेर किल्ला येथे सकाळी ११ वाजता मनोज जरांगे यांचा नियोजित कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर साल्हेर किल्ल्याहून छत्रपती संभाजीनगर मार्गे ते अंतरवाली सराटी येथे जाणार आहेत. पुन्हा ९ तारखेला त्यांचा दौरा बीड येथे असणार आहे. त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी महत्त्वाची बैठक घेऊन अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. 

हे ही वाचा:

मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत लक्ष वेधले, सुप्रिया सुळे

व्हॅलेंटाईन डे निमित्त करण जोहरची ‘लव्ह स्टोरीज’ सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss