Sunday, May 19, 2024

Latest Posts

Exclusive Eknath Shinde: विरोधकांनी माझ्या कामाचा धसका घेतला कारण…

टाईम महाराष्ट्र या वेबपोर्टलचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत अनेक गोष्टींचा उलगडा केला.

आताची निवडणूक ही याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) विरुद्ध राहुल गांधी (Rahul Gandhi) अशी होती पण आता राज्यात ही लढत ठाकरे (Thackeray) विरुद्ध शिंदे (Shinde) अशी झाली आहे, विरोधकांनी तुमच्या कामाचा धसका घेतलाय का? असा प्रश्न टाईम महाराष्ट्र (Time Maharashtra) वेबपोर्टलचे मुख्य संपादक राजेश कोचरेकर यांनी विचारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, हो कामाचा धसका घेतलाच आहे, कारण माझ्याइतके ते फिरू शकत नाहीत. माझ्यामुळे आता त्यांचा पट्टा उतरला, ते गावा-गावांत आता फिरू लागले. हे जर आधी फिरले असते तर बरं झालं असतं, पण ठीक आहे. आमची ही लढाई देशाची लढाई आहे, देशाच्या विकासाची लढाई आहे. आमची लढाई वैयक्तिक नाही. ही कुठल्याही एका मतदारसंघाची लढाई नाही.

राहुल गांधी (Rahul Gandhi) तर सारखा विदेशात पळून जातो

या देशाला इतक्या उंचीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) घेऊन गेले, त्यांनी देशाचा विकास केला, ते सर्व मोदींमुळे शक्य झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे एकही दिवस सुट्टी न घेता काम करतात. त्यांनी स्वतःला देशासाठी समर्पित केले आहे. सगळी जनता काम बघून मतदान करणार आहे, आणि निर्णय घेणार आहे. त्यांचे कर्तृत्व खूप मोठे आहे. त्यामुळे लोकांनी निर्धार केला आहे, गॅरंटी दिली आहे, त्यामुळे लोकांचा निर्णय हा महत्त्वाचा असणार आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) तर सारखा विदेशात पळून जातो, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि देशाची बदनामी करतो, आणि इकडे काय करतो खूप देशप्रेम आहे, असे दाखवतो. लोकं काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे उभे राहतील की, परदेशात जाऊन थंड हवा घ्यायला जाणाऱ्याच्या मागे उभे राहतील? असा सवाल विचारत याबाबत तुलना होऊच शकत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.

हे ही वाचा:

आजारपणानंतर Sheyasचे Comeback, नवा चित्रपट घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला पराभवाच्या भितीने Narendra Modi यांच्या तोंडी हिंदू-मुस्लीम, पाकिस्तानची भाषा, Ramesh Chennithala यांचे टीकास्त्र Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss