Saturday, July 27, 2024

Latest Posts

नाशिकमध्ये जय भवानी रोडवर गोळीबार, शहरात भीतीचे वातावरण

राज्यभरात गोळीबाराचे सत्र सुरु आहे.

राज्यभरात गोळीबाराचे सत्र सुरु आहे. उल्हासनगरमध्ये झालेली गोळीबाराची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये सुद्धा मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार करण्यात आला आहे. हा गोळीबार जय भवानी रोडवर (Jai Bhavani Road Nashik) झाला. संशयित व्यक्तींनी दोन राऊंड फायर केले आहेत. संशियत व्यक्तींनी गोळीबार करून तिकडून पळ काढला. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमधील जय भवानी रोड परिसरातील साई श्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या राहुल उज्जैनवाल याच्यासोबत असलेल्या जुन्या भांडणाच्या वादावरून गोळीबार करण्यात आला. उज्जैनवाल कुटुंबीय घरी झोपलेले असताना अचानक त्यांच्या इमारतीखाली एका टोळीने हातात कोयते घेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तिथे असलेल्या काचेच्या बाटल्या फोडल्या. एवढाच नाही तर त्यांनी संशयितांकडून राहुलला समोर आणा त्याचा मुडदाच पाडतो, अशी धमकी देण्यास सुरुवात केली. संशयितांनी दोन राऊंड फायर केले. त्यानंतर आरोपींनी घटनस्थळावरून पळ काढला. या घटनेविरोधात सात जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस रात्री गस्त घालत नसल्यामुळे नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे असे बोलले जात आहे. घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक पुणे महामार्गावर ) इच्छामणी लॉन्सजवळ एका व्यक्तीकडे संशयित गावठी कट्टा बाळगत असल्याची गुप्त माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे हवालदार जयंत शिंदे, सोमनाथ गुंड यांना मिळाली होती. याची चौकशी करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून एक कट्टा व तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहे. शुभम अशोक जाधव, सचिन धर्मा सोनवणे, गणेश जगदीश भालेराव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हे ही वाचा:

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणूक, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bharat Ratna Lal krishna Advani : अयोध्येसाठी रथयात्रा काढून आडवाणींनी राजकारणात केली होती उलथापालथ, जाणून घ्या सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss