Tuesday, April 16, 2024

Latest Posts

आजपासून मनोज जरांगे रायगड दौऱ्यावर, असा असणार जरांगेंचा दौरा

मनोज जरांगे यांनी अखेर मराठा आरक्षणाचा लढा जिंकला आहे.

मनोज जरांगे यांनी अखेर मराठा आरक्षणाचा लढा जिंकला आहे. त्यानंतर राज्यभरात सगळीकडे आनंद व्यक्त केला जात आहे. हाच आनंद साजरा करण्यासाठी मनोज जरांगे रायगडावर (Raigad) जाणार आहेत. रायगडावर जाऊन ते गुलाल उधळणार आहेत. त्यानंतर मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. आरक्षणाचा लढा अखेर मनोज जरांगे यांनी जिंकला आहे.पण आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळेपर्यंत मनोज जरांगे यांचे उपोषण चालू असणार आहे.

या दौऱ्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, अनेक वर्षाच्या संघर्षाला अखेर यश मिळाले आहे. मराठा समाजाला अखेर न्याय मिळाला आहे. आपण आरक्षणाची लढाई जवळपास जिंकली आहे. आता जोपर्यंत कायदा होत नाही, तोपर्यंत आपल्याला सजग राहावे लागणार आहे. आपल्या लढ्याला यश मिळाल्याने अगोदर जाहीर केल्यानुसार मी २९ जानेवारीला रायगडावर जाणार आहे. तेथे विजयाचा गुलाल उधळणार आहे. आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे सल्ले मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे यांचा रायगड दौरा नक्की कसा असणार.

२९ जानेवारीला आज मनोज जरांगे आंतरवली सराटी मधून ७ वाजता दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. गेवराई-(बीड), पाथर्डी,तिसगाव, कोडगाव, अहमदनगर, दौंड, केडगाव चौफुला, येळंब, भोर,पोलाद नगर येथून रायगडला जाणार आहे.त्यानंतर ते ३० जानेवारीला रायगडावर जाऊन दर्शन घेणार आहेत. मराठा समाजाने मराठा आरक्षणाची लढाई जिंकली आहे असं मनोज जरांगे म्हणाले. त्यामुळे राज्यभरात सगळीकडे जल्लोष केला जात आहे. दरम्यान, आजपासून मनोज जरांगे रायगड दौऱ्यावर असणार आहेत. मनोज जरांगे यांच्या पुढे सरकार झुकलं आणि आरक्षणाचा अध्यादेश दिला असे सगळीकडे बोलले जात आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांचे गावागावात स्वागत केले जात आहे. मराठा आरक्षणासाठी मागील पाच महिन्यांपासून मनोज जरांगे यांनी घराची पायरी चढली नाही. २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु केले होते. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत घराची पायरी चढणार नाही, असे जरांगे म्हणाले होते.

हे ही वाचा:

‘बिग बॉस १७’च्या ट्रॉफीचा मानकरी ठरला मुनव्वर फारुकी,खास पोस्ट केली शेअर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss