Tuesday, April 16, 2024

Latest Posts

गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

गडचिरोलीमध्ये गडचिरोली पोलीस दलामार्फत “आपला जिल्हा, आपला महोत्सव' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गडचिरोलीमध्ये गडचिरोली पोलीस दलामार्फत “आपला जिल्हा, आपला महोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, येणाऱ्या आगामी काळात गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यामाध्यमातून लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणार आहे, असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या काळात गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती या माध्यमातून होणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्राच्या तिजोरीला गडचिरोली जिल्ह्याचे देखील मोठे योगदान असणार आहे. महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे. आता उलट म्हणावं लागेल महाराष्ट्रातला पहिला जिल्हा हा गडचिरोली जिल्हा आहे. गडचिरोलीतून महाराष्ट्राची सुरुवात होते, असे फडणवीस म्हणाले. गडचिरोलीमध्ये मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वे येणार आहे. तसेच समृद्धी महामार्ग गडचिरोली पर्यंत बनवण्यात येणार आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटी ही मुंबईला देखील जोडणार आहे. गडचिरोलीला पोर्टशी जोडण्याकरिता एक अभ्यास गट निर्माण केला आहे. हा अभ्यास गट गडचिरोलीच्या नद्यांमधून जहाजाची वाहतूक करून आंध्र प्रदेशच्या फोर्टपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी कशी निर्माण करता येणार याच अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास गट निर्माण केला आहे. त्यामुळे प्रचंड मोठा विकास होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात विकासाची यात्रा आता सुरू झाली आहे ही यात्रा आता थांबणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

गडचिरोलीमध्ये मुक्काम करणे पहिले मंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी दोन वेळा गडचिरोलीमध्ये मुक्काम केला आहे. ते गृहमंत्री म्हणून पोलिस दलाच्या पाठिशी ठाम संदेश उभे आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री झाल्यापासून १६ महिन्यांमध्ये सात वेळा गडचिरोली दौरा केला आहे. गडचिरोलीमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. १५ ऑगस्ट २०२३ ला महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर कोठी कोरनार पुलाचे उद्घाटन त्यांनी केले होते.

Latest Posts

Don't Miss