गौतमी पाटील हिने उदयनराजेंच्या जलमंदिरावर जाऊन घेतली भेट

गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिच्या अदाकारीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आणि त्यामुळेच तीळ चांगल्या ऑफर्स देखील मिळतात.

गौतमी पाटील हिने उदयनराजेंच्या जलमंदिरावर जाऊन घेतली भेट

गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिच्या अदाकारीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आणि त्यामुळेच तीळ चांगल्या ऑफर्स देखील मिळतात. सध्या वाढदिवसाचे निमित्त असले तरी गौतमीचा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे तिच्या अदाकारीची चर्चा चांगलीच रंगलेली पाहायला मिळते. दरम्यान, सोलापूरमधल्या बार्शी या ठिकाणी गौतमी पाटीलच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. आयोजक राजेंद्र गायकवाड यांनीच ही तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाविषयी गौतमी पाटील हिला विचारले असता या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊनच मी माझी भूमिका मांडेन, असं गौतमी पाटीलनं हिरे सांगितलं आहे.

गौतमी पाटील हि साताऱ्यात आली असता, तिनं भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली.यावेळी गौतमीनं उदयनराजे यांना खास भेटवस्तू देखील दिली. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने सोमवारी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी गौतमीनं दिलेल्या प्रतिक्रियेत महाराजांना पहिल्यांदाच मी भेटले. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा यासाठी मी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी आले असल्याचं सांगितलं. या भेटीत तिनं खासदार उदयनराजे भोसलेंना त्यांचा आवडता परफ्यूम भेट दिला. माझे जरी चाहते असले तरी, छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचं दैवत आहेत. त्यामुळं मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही. त्यांची बरोबरी माझ्याबरोबर नको, अशी प्रतिक्रियाही तिने माध्यमांना सांगताना दिली.

गेल्या काही दिवसांपासून मी पाहते आहे की माझ्यावरुन वाद होत आहेत. पण गौतमी सांगते माझ्या प्रत्येक कार्यक्रमावरून वाद हे होत नाही असं नाही काहीतरी छोटं-मोठं घडतं. ते वाढवून वाढवून सांगितलं जातं. बार्शीतही माझ्यावर हा आरोप केला गेला आहे की मी वेळेत गेले नाही. मात्र तसं नाही मी वेळेत गेले होते. असे गौतमी हिचे ठाम मत आहे. फक्त ते सगळं प्रकरण मी समजून घेईन आणि मगच त्याबाबत बोलेन असंही गौतमीने सांगितलं. उदयनराजे याना भेटल्यानंतर त्यांच्यात चर्चा झाल्या त्यावेळी गौतमी म्हणाली , मला कुठल्याही राजकारणात यायचं नाही. मी एक कलाकार आहे. मी माझी कला सादर करत राहणार आहे असं गौतमीने म्हटलं आहे. तसंच गौतमीने प्रेक्षकांनाही महत्त्वाचं आवाहन केलं. “माझं सगळ्या प्रेक्षकांना एवढंच सांगणं आहे की, तुम्ही एवढ्या लांबून माझ्या कार्यक्रमाला येत असतात, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. माझं एकच म्हणणं आहे, प्रत्येक कार्यक्रमाला वाद होत नाहीत. थोडंफार होतं. पण ते पुढे वाढवलं जातं. त्यामुळे काहीतरी चर्चा होते. कार्यक्रमाला या, कार्यक्रम एन्जॉय करा आणि शांतपणे घरी”, असं आवाहन गौतमी पाटील हिने केलं.

हे ही वाचा : 

कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा कारभार कोण सांभाळणार सिद्धरामय्या की शिवकुमार?

Aryan Khan ड्रग्स प्रकरणात Sameer Wankhede यांच्या अडचणीत वाढ | Aryan Khan | Sameer Wankhede

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version