Saturday, March 2, 2024

Latest Posts

मनोज जरांगे यांनी सांगितला मुंबईत उपोषणाला येण्याचा प्लॅन

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक वाद निर्माण झाले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकीय वर्तुळामध्ये अनेक वाद निर्माण झाले आहेत. आता मनोज जरांगे हे लवकरच २० जानेवारीला आरक्षणाच्या मागणीवरून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत. आंतरवली सराटी गावातून मराठा आंदोलक उपोषणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. मनोज जरांगे यांनी आंतरवली ते मुंबई हा प्रवास कसा असणार आहे, तसेच हा प्रवास किती दिवसांचा असणार हे सांगितले आहे.

यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, २० जानेवारीला आम्ही आंतरवली सराटी गावातून मुंबईच्या दिशेला निघणार आहोत. रस्त्यामध्ये आमच्या या रॅलीत अनेक मराठा बांधव सहभागी होतील. सकाळी ९ वाजत आम्ही आंतरवली सराटी गावातून निघणार आहोत. पायी प्रवास करून आम्ही मुंबईमध्ये येणार आहोत. मराठा आंदोलनाची तयारी करण्यासाठी समाजाला वेळ पाहिजे. कारण विषय लहान नाही. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात नियोजन करावे लागणार आहे. तिथे जाऊन फक्त परत यायचं नाही. अनेकांची शेतीची कामे बाकी आहेत. ती उरकण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यामुळे दहा ते पंधरा दिवसात सगळी कामे आवरून घेऊ. सगळी कामे करून गेल्यास उपोषणात सहभागी होणारे निवांत राहतील. त्यांचा घरी जीव गुंतणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता आंही आंतरवली सराटी गावातून मुंबईकडे निघणार आहोत. मुंबईमध्ये पोचण्यासाठी ५ ते ६ दिवस लागतील. १६ जानेवारीपासून प्रत्यक्षात मुंबईमध्ये उपोषणाला सुरुवात होणार आहे. या काळात २४ जानेवारीला सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह याचिकेवरसुनावणी होणार आहे. या क्युरेटीव्ह याचिकेला आम्ही कधीच विरोध केला नाही. पण आमचं एवढंच म्हणणं आहे ते आरक्षण टिकेल का? पुन्हा गेल्या वेळेसारखं होऊ नये. न्यायालयात खुली सुनावणी झाली तर ते आरक्षण टिकेल असे मनोज जरांगे म्हणाले.

२० जानेवारी पर्यंत सरकारसाठी चर्चेची दार उघडी आहेत. मराठा आरक्षणावर जर मार्ग निघत असेल तर २० जानेवारी पर्यंत चर्चेला काही हरकत नाही. मुंबईला जाण्याची आम्हाला काही हौस नाही. आम्ही फक्त आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये जाणार आहोत. त्यापूर्वी जर आरक्षण दिल तर आम्ही इथेच आनंद साजरा करू, तुम्हला डोक्यावर घेऊनही नाचू, असे मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

Anil Kapoor birthday  : सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अनिलजी यांचा बॉलीवूड प्रवास जाणुन घ्या

POLITICS: स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्याची घोषणा, CHHAGAN BHUJBAL यांच्याकडून AJIT PAWAR यांचे कौतुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss