Friday, April 19, 2024

Latest Posts

मराठा आरक्षणाचा कायदा झाला असून सर्व मराठा समाजाला त्याचा फायदा मिळणार आहे – मनोज जरांगे

मागील पाच महिन्यांपासून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते.

मागील पाच महिन्यांपासून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर अखेर आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईच्या दिशेने आले होते. मुंबईमध्ये आल्यानंतर अखेर मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. सरकारने मनोज जरांगे यांच्याकडे आरक्षणाचा अध्यादेश दिल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चाना उधाण आले आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले आहे. अध्यादेशातून मराठा समाजाची फसवणूक करण्यात आला आहे, असा आरोप अनेक नेत्यांनी केला आहे. सर्वस्थरातून केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रतिउत्तर केले आहे. मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणाचा कायदा झाला असून, त्यामुळे सर्वच मराठा समाजाला याचा लाभ मिळणार आहे. मराठवाड्यातील (Marathwada) काही लोकं चुकीची अफवा पसरवत आहेत. पण लक्षात ठेवा मराठवाड्याला कचून आरक्षण मिळणार असून, मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणापासून (Maratha Reservation) वंचित राहणार नाही, मनोज जरांगे म्हणाले आहेत. तसेच आजपासून मनोज जरांगे रायगड दौऱ्यावर जाणार आहेत.

मनोज जरांगे म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रायगडावर चाललो आहे. उद्या रायगडावर जाऊन शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होणार आहे. सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबत अध्यादेश काढला आहे. मराठा बांधवांना आणखी यात काही मांडायच असेल, तर हरकती मांडा. मराठवड्यात कमी नोंदी असल्याने गॅझेट घ्यायचे सरकारला सांगितले आहे. मराठवड्यातील एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही. या कायद्याच्या मार्फत अंमलबजवणी आणि पहिले प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विजयी सभा घेणार आहे. या अधिसूचनेवर हरकती मागवण्यासाठी १५ दिवस आहेत. सगेसोयरे हा अंतिम शब्द आहेत आणि यापासून लाखो लोकांचा फायदा होणार आहे, असे जरांगे म्हणाले.

ओबीसी नेते बैठक घेत आहे, पण आता काहीच होणार नाही. आता राजपत्र निघाले आहे. भुजबळ यांना तेच काम आहे. लोकांच्या अन्नात माती कालवण्याचे काम आम्ही करत नाही, असे बोलून मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली आहे. ओबीसी नेते आमच्यावर अन्याय होत असल्याचे म्हणत आहे. मात्र, आमच्यावर देखील खूप दिवस अन्याय झाला असल्याचे जरांगे म्हणाले. तसेच ओबीसी नेते आंदोलन करत असतील तर त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

अनेकदा वादाच्या कचाट्यात सापडला आहे ‘बिग बॉस १७’चा विजेता,जाणुन घेऊयात मुनव्वर फारुकीचा प्रवास…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारपासून नाशिक दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss