Sunday, May 19, 2024

Latest Posts

मिरज तालुक्यात घडली धक्कादायक घटना

डॉक्टर दाम्पत्याच्या घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या बंगल्यावर तीन मृतदेह सापडले आहेत. या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण मिरज तालुका हादरून गेला आहे.

घरातील एकाच वेळी नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगली येथील मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावात सोमवारी दुपारी उघडकीस आली. डॉक्टर दाम्पत्याच्या घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या बंगल्यावर तीन मृतदेह सापडले आहेत. या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण मिरज तालुका हादरून गेला आहे. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आत्महत्या केलेल्या व्यक्तींमध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वनमोरे (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे. घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक आलगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जणांनी विष घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह सापडले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत तेथील रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या या घटनेमुळे मिरज तालुका हादरून गेला आहे. म्हैसाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Latest Posts

Don't Miss